Income Tax : मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या प्रत्यक्ष कर संकलनात 160 टक्क्यांची वाढ, ITR 105 टक्क्यांनी वाढला
Direct Tax Collections: 2013-14 या आर्थिक वर्षात एकूण 3.80 कोटी आयकर रिटर्न भरले होते, या संख्येत 104.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Income Tax Update : मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collections) 160 टक्क्यांनी वाढ झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 2023-14 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 6,38,596 कोटी रुपये होते. ते आता 2022-23 या आर्थिक वर्षात 16,63,686 कोटी रुपये झाले आहे. या नऊ वर्षांच्या कालावधीत एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 173.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंतच्या कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, 2013-14 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 6,38,596 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पुढील 9 वर्षांमध्ये वाढून 16,63,686 कोटी रुपये झाले आहे. 2013-14 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 7,21,604 कोटी रुपये होते, जे 173.31 टक्क्यांनी वाढून 19,72,248 कोटी रुपये झाले आहे.
CBDT ने म्हटले आहे की 2013-14 मध्ये देशात डायरेक्ट ते डीजीपी गुणोत्तर 5.62 टक्के होते, जे 2022-23 मध्ये 6.11 टक्के झाले आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात एकूण 3.80 कोटी आयकर रिटर्न भरले होते, ज्यात 104.91 टक्क्यांनी वाढ होऊन ती 7.78 कोटी रुपये झाली आहे.
Income Tax Department has released a consolidated Time-Series data upto FY 2022-23 with a focus on placing key statistics related to Direct Taxes in public domain.
— Income Tax India (@IncomeTaxIndia) January 23, 2024
Key highlights:
👉160.52% growth in Net Direct Tax Collections from Rs. 6,38,596 crore in F.Y. 2013-14 to Rs.… pic.twitter.com/z752Nj1RWi
आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली (ITR Percentage Increased)
तसेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या 8.18 कोटी झाली आहे, जी मागील मूल्यांकन वर्षात 7.51 कोटी होती. 2023-24 च्या मूल्यांकन वर्षात 9 टक्के अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाने करदात्यांना AIS आणि TIS ची सुविधा सुरू केल्यानंतर करदात्यांची संख्या वाढली आहे.
CBDT नुसार, 2013-14 मध्ये एकूण 5,26,44,496 करदाते होते, ज्यांची संख्या 2022-23 मध्ये 9,37,76,869 पर्यंत वाढली आहे. आकडेवारीनुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात संकलनाचा खर्च एकूण संकलनाच्या 0.57 टक्के होता, जो 2-22-23 मध्ये 0.51 टक्के झाला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: