एक्स्प्लोर

Loan: रेपो रेट वाढताच बँकांकडून व्याजदर वाढण्यास सुरुवात, या बँकांचं कर्ज महागलं

आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बॅंकेकडून (PNB )व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

Loan Costly : रिझर्व्ह बॅंकेकडून (Reserve Bank of India) रेपो रेट  (Repo Rate Increased) वाढवल्यानंतर बॅंकांकडून कर्जावरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बॅंकेकडून (PNB )व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (I-EBLR) आरबीआयच्या पॉलिसीसोबत जोडण्यात आले आहेत. 

आय-ईबीएलआर वार्षिक 9.10 टक्के आणि दरमहा दर हे 5 ऑगस्टपासून लागू होतील.  पंजाब नॅशनल बॅंकेकडून देखील रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) 7.40 टक्क्यांवरून 7.90टक्के होणार आहे. 8  आॅगस्टपासून हा दर लागू होणार आहे.  दोन्ही बॅंकांच्या ह्या निर्णयामुळे गृहकर्ज, पर्सनल आणि आॅटो लोनमध्ये वाढ होणार आहे.  आयसीआयसीआय बॅंकेकडून एमसीएलआरमध्ये 0.15 टक्के वाढ होणार आहे. 

आरबीआयकडून रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय

काल आरबीआयने रेपो दरात (RBI Hike Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला.  त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget