एक्स्प्लोर

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद, आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांचे अर्ज, कसा कराल अर्ज?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला (Krishi Solar Pump Yojana) शेतकऱ्यांचा (Farmers) मोठा प्रतिसाद मिळत आहे. 14 दिवसात राज्यातील 1 लाख 22 हजार 421 शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

Krishi Solar Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला (Krishi Solar Pump Yojana) शेतकऱ्यांचा (Farmers) मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरु केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केवळ 14 दिवसात 1 लाख 22 हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

14 दिवसात राज्यातील 1 लाख 22 हजार 421 शेतकऱ्यांनी केले अर्ज

राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाईट तयार केली असून तिचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक झाले होते. त्यानंतर केवळ 14 दिवसात दि. 27 सप्टेंबरपर्यंत राज्यातील 1 22 421 शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते.

सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात जालना जिल्ह्याची बाजी

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून 52067 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (24526 अर्ज), परभणी (15.43अर्ज), छत्रपती संभाजीनगर (6888 अर्ज) आणि हिंगोली (5079अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ 10 टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. 

एकदा संच बसवला की, शेतकऱ्याला 25 वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन

सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की, शेतकऱ्याला 25 वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कुठे कराल नोंदणी?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावा. वेबसाईटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाईटवर तपासता येते.

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Tumsar :  राज्याची तिजोरी माझ्याकडे...अजितदादांचं धडाकेबाज भाषणTop 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 07 PM : 28 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीकाBhaskar Jadhav Praniti Shinde : Ladki Bahin Yojana वरुन प्रणिती शिंदे,भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Embed widget