पीएफ काढताना फक्त 'या' चार गोष्टी करा, कधीच क्लेम रिजेक्ट होणार नाही!
आपत्कालीन स्थितीत ईपीएफ खात्यातून पैसे काढता येतात. मात्र त्यासाठी अर्ज करताना तुम्हाला योग्य काळजी घेत अर्ज करावा लागतो. तसे न केल्यास तुमचा ईपीएफ क्लेम रिजेक्ट होतो.
मुंबई : खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार निवृत्तीनंतर आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ईपीएफच्या रुपात गुंतवणूक करतात. आणीबाणीच्या स्थितीत नोकरदार या पैशांचा वापर करू शकतात. ईपीएफमध्ये जमा केलेल्या पैशांची देखरेख एम्प्लॉईज प्रोव्हिडेंड फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ही संघटना करते. काही खास परिस्थितीत ईपीएफमधील पैसे काढता येतात. अशा स्थितीत पैशांसाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या दहा दिवसांत हे पैसे नोकरदाराच्या बँक खात्यात पाठवले जातात. मात्र अर्ज करताना काही त्रुटी आढळल्यास तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट केला जातो. हा क्लेम रिजेक्ट होऊ नये, म्हणून काही काळजी घेणं गरजेचं आहे. खाली नमूद केलेल्या बाबींची काळजी घेतल्यास तुमचा ईपीएफ क्लेम नाकरला जाणार नाही
पीएफ काढण्यासाठी एकदा अर्ज केल्यानंतर तो रिजेक्ट झाला, की नोकरदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. आणीबाणीच्या काळात पैशांची गरज असते, पण ईपीएफओ तुमचा क्लेम रिजेक्ट करते, त्यामुळे त्रागाही वाटतो. मात्र काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास तुमचा हा क्लेम रिजेक्ट होणार नाही.
अर्धवट आणि चुकीची माहिती भरू नका
ईपीएफओ सबस्क्रायबरची केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे. यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा खातेधाराच्या बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचा मोबाईल नंबर आणि पत्तादेखील अपडेट असणे गरजेचे आहे.
वैयक्तिक माहिती चुकीची देऊ नका
ईपीएफ क्लेम करताना चुकीची माहिती देऊ नये. सबस्क्रायबरचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आदी माहिती योग्य आणि कोणतीही चूक न करता भरणे गरजेचे आहे. पीएफ काढताना तुम्ही जी माहिती टाकलेली असते, ती माहिती ईपीएफओ पडताळून पाहते, या माहितीत काही तफावत आढळल्यास तुमचा ईपीएफ क्लेम रिजेक्ट केला जातो.
बँक खात्याची चुकीची माहिती भरू नका
अनेकदा सबस्क्रायबर पीएफ खात्याचा अर्ज करताना बँक अकाऊंटच्या माहितीकडे दुर्लक्ष करतो. अर्ज करताना तुम्ही दिलेल्या बँख खात्याची माहिती लक्षपूर्व आणि योग्य पद्धतीने भरणे गरजेचे आहे. बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, ब्रांच डिटेल्स योग्य पद्धतीने भरणे गरजेचे आहे. यात काही तफावत आढळल्यास तुमचा क्लेम रिजेक्ट होतो.
अर्धवट कागदपत्रे जाम करू नयेत
पीएफ काढण्यासाठी अर्ज करताना फॉर्मसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांमध्ये ओळखपत्र, अॅड्रेस प्रुफ आदी कागदपत्रांचा समावेश आहे. पीएफ काढण्यासाठीचा अर्ज जमा करताना या कागदपत्रांची पडताळणी एकदा आवश्य करावी.
हेही वाचा :
अवघ्या दोन महिन्यांत होणार 35 लाख लग्न, तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार!