HDFC Bank : एचडीएफसीने बँकेने फिक्स डिपॉझिटवरचे व्याजदर वाढवले, बघा काय आहेत नवीन दर
एचडीएफसी बँकेनेही (HDFC Bank) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 5-10 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे.
HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतर आता एचडीएफसी बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 5-10 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. नवीन दर 14 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत.
एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 5-10 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. याआधी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने देखील 2 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींच्या व्याजदरात 10-15 आधार अंकांनी वाढ केली होती.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवींवर बँक किती व्याज देते ते पाहुया
- 7 ते 14 दिवस - 2.50%
- 15 ते 29 दिवस - 2.50%
- 30 ते 45 दिवस - 3.00%
- 46 ते 60 दिवस - 3.00%
- 61 ते 90 दिवस - 3.00%
- 91 दिवस ते 6 महिने - 3.50%
- 6 महिने 1 दिवस ते 9 महिने - 4.40%
- 9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष - 4.40%
- 1 वर्ष - 5.00%
- 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे - 5.00%
- 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे - 5.20%
- 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे - 5.45%
- 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे - 5.60%
एचडीएफसी बँकेशिवाय, एसबीआयने 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठीच्या किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्येही सुधारणा केली आहे. 2 वर्ष ते 3 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एसबीआय रिटेल मुदत ठेवींवर आता 5.10 टक्क्यांऐवजी 5.20 टक्के व्याजदर मिळेल. तसेच 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीसाठी 5.30 टक्क्यांऐवजी 5.45 टक्के आणि 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी 5.40 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: