सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा; महिना 1.67 लाख रुपये मिळवा
सरकारी नोकरीसाठी (Govt Job) प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी सुवर्णसंधी आली आहे. हरियाणा लोकसेवा आयोग (Haryana Public Service Commission) मध्ये नोकरीसाठी जागा निघाल्या आहे.
Govt Job: सरकारी नोकरीसाठी (Govt Job) प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी सुवर्णसंधी आली आहे. हरियाणा लोकसेवा आयोग (Haryana Public Service Commission) मध्ये नोकरीसाठी जागा निघाल्या आहे. याद्वारे तुम्हाला सरकारी अधिकारी बनण्याची संधी मिळाली आहे. तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काही गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात. जाणून घेऊयात या नोकरीबद्दल सविस्तर माहिती.
अर्ज करण्याची प्रक्रिया 11 मार्चपासून सुरु होणार
हरियाणा लोकसेवा आयोग (HPSC) अंतर्गत हरियाणामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आेहे. FSL, मधुबन, कर्नाल, हरियाणा येथे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांवर भरती केली जाईल. तुमच्याकडे या पदांशी संबंधित पात्रता असल्यास, तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 11 मार्च म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च
HPSC भर्ती 2024 द्वारे एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. HPSC भरतीच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 26 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.
निवड झाल्यावर वेतन किती?
HPSC भर्ती 2024 प्रकियेत उमेदवार अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडला गेला तर त्या उमेदवाराला 53100 ते 167800 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. त्यामुळं सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा काय?
उमेदवारांचे वय 01,02.2023 रोजी किंवा त्यापूर्वी आणि सेवा नियमांनुसार 20 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
फॉर्म भरण्याची आवश्यक पात्रता का?
उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र/गणित/सांख्यिकी/रसायनशास्त्र/फॉरेन्सिक सायन्समध्ये M.Sc पदवी असावी.
उमेदवाराला वरीलपैकी कोणत्याही विषयातील संशोधन आणि विश्लेषणाचा 3 वर्षांचा अनुभव असावा.
मॅट्रिकपर्यंत हिंदी/संस्कृतचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे.
अधिक माहितीसाठी HPSC भरती 2024 अधिसूचना पाहावी. यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क किती?
HPSC भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेवर आधारित, उमेदवाराला 1000 रुपये नॉन-रिफंडेबल अर्ज फी जमा करावी लागेल. अर्जाची फी फक्त नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे भरली जाईल.
महत्वाच्या बातम्या:
Job Majha : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' ठिकाणी आजच अर्ज करा