GST : अंत्यविधीच्या वस्तूंवर जीएसटी कर? सरकारने स्पष्ट सांगितले, म्हटले...
GST on Crematorium Services: अंत्यविधीशी निगडीत वस्तू, सेवांवर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
GST on Crematorium Services: केंद्र सरकारने 18 जुलैपासून लागू केलेल्या जीएसटी करावरून (GST) लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. खाद्यान्नासह इतर महत्त्वाच्या वस्तूंवर जीएसटी लागू झाल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. केंद्र सरकारने (Central Government) अंत्यसंस्कार, स्मशानभूमी अथवा शवागारगृह सेवेवर सरकारने जीएसटी लागू केला आहे. या वस्तूंवर केंद्र सरकारने 18 टक्के जीएसटी लागू केला जात असल्याचे वृत्त होते. केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार, अंत्यविधीशी निगडीत बाबींवर 18 टक्के जीएसटी लागू केला असल्याचाही दावा होत आहे. पीआयबी विभागाने यावर आता स्पष्टीकरण देणारे ट्वीट केले आहे.
PIB Fact Check ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अंत्यविधीशी निगडित असलेल्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याचे वृत्त निराधार आहे. अंत्यसंस्कार, दफनविधी, स्मशान अथवा शवागारगृहाच्या सेवांवर कोणताही जीएसटी लागू करण्यात आला नाही. 18 टक्के लागू करण्यात आलेला जीएसटी हा यासंबंधीच्या कामासाठी असलेल्या कंत्राटावर लावण्यात आला आहे, असेही पीआयबीने दिलेल्या माहितीत म्हटले.
Claim: There will be 18% GST on Crematorium Services.#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 20, 2022
▶️This claim is #Misleading.
▶️There is no GST on funeral, burial, crematorium, or mortuary services.
▶️In this reference GST @ 18% is only applicable for work contracts and not the services. pic.twitter.com/7HE2MPMs1s
तुम्ही करू शकता Fact Check
जर तुम्हालादेखील अशा प्रकारचे काही मेसेज आले असल्यास त्याबाबत सत्य माहिती जाणून घेण्यासाठी पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याशिवाय +918799711259 या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्याशिवाय, pibfactcheck@gmail.com या ई-मेल आयडीवर व्हिडिओदेखील पाठवू शकता.