![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आता प्लॅटफॉर्म तिकीट करमुक्त, सौर कुकरवर 12 टक्के जीएसटी; जाणून घ्या नेमकं स्वस्त काय महाग काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत करासंबंधीच्या महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या.
![आता प्लॅटफॉर्म तिकीट करमुक्त, सौर कुकरवर 12 टक्के जीएसटी; जाणून घ्या नेमकं स्वस्त काय महाग काय? gst council meeting in presence of finance minister nirmala sitharaman suggest different tax for different things like milk can railway platform आता प्लॅटफॉर्म तिकीट करमुक्त, सौर कुकरवर 12 टक्के जीएसटी; जाणून घ्या नेमकं स्वस्त काय महाग काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/40328e18d79dc2943fbe7fd629afa7431719111005682988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 53 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीसंबंधी वेगवेगळ्या सेवा, वस्तू यांच्यावरील करासंबंधी महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या. या शिफारशींचा थेट परिणाम आता सामान्य नागरिकांवर पडणार आहे. या बैठकीत प्लॅटफॉर्म तिकीट, सौरकुकर अशा वेगवेगळ्या वस्तूंच्या करासंबंधीही (GST) काही शिफारशी केल्या आहेत.
प्लॅटफॉर्म तिकीट जीएसटी मुक्त
निर्मला सीतारामन यांनी बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, भारतीय रेल्वेतील प्लॅटफॉर्म तिकीट आता जीएसटी मुक्त असेल. यासह रिटायरिंग रुमच्या सुविधा, वेटिंग रुम, क्लॉकम रुम सेवा, बॅटरीवर आधारित कार सेवा यांनादेखील जीएसटीतून सूट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
#WATCH | On the 53rd GST Council Meeting, Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "Council recommended to prescribe a uniform rate of 12% on all milk cans meaning steel, iron, aluminum which are irrespective of the use. They are called milk cans but wherever they are used… pic.twitter.com/csf4Nmx2n3
— ANI (@ANI) June 22, 2024
कार्टन बॉक्स आणि पेपर बोर्डवरील जीएसटी कमी करण्याची शिफारस
तसेच सर्व प्रकारच्या कार्टन बॉक्स आणि पेपर बोर्डवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिमाचल प्रदेश आणि काश्मीरचे शेतकरी कार्टन बॉक्सवरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी करत होते. या निर्णयानंतर शेतकऱ्यांसह या क्षेत्रातील उद्योगांचाही मोठा फायदा होणार आहे.
सौर कुकरवर 12 टक्के जीएसटी लावण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली.
दूध कॅनवर आता सरसकट 12 टक्के जीएसटी
जीएसटी परीषदेने सर्व दूध कॅनवर 12 टक्के याप्रमाणे समान कर लागू करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजेच आता स्टील, पोलाद, अॅल्यूमिनिअम अशा कोणत्याही प्रकारच्या दुधाच्या कॅनवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. फायर वॉटर स्प्रिंकलर अशा प्रकारच्या स्प्रिंकलर्सवर 12 टक्क्यांनी जीएसटी लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
खोट्या पावत्या तयार करून फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसावी यासाठी बायोमॅट्रिकवर आधारित नवी प्रणाली चालू करण्याचीही शिफारस या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, लकरच केंद्र सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यावेळी केंद्राकडून काय महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अनिल अंबानींची 'ही' कंपनी सुस्साट, एका लाखाचे झाले 23 लाख, गुंतवणूकदारांना मिळाले पैसेच पैसे!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)