एक्स्प्लोर

मोठी बातमी! ...तोपर्यंत फोन पे, क्रेड ॲपवरून भरता येणार नाही क्रेडिट कार्डचे बील; 30 जूननंतर काय बदलणार?

आरबीआयने नुकताच एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम येत्या 1 जुलै रोजीपासून लागू होणार आहे. हा नियम क्रेडिट कार्डच्या बिलासंदर्भात आहे.

मुंबई : आरबीआयने (RBI) क्रेडिट कार्ड्सचे (Credit Card) बील भरण्यासंदर्भात नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार क्रेडिट कार्ड्सचे बील हे आरबीआयच्या बीबीपीएस या प्राणालीच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे. त्यामुळे या नव्या नियमाचा परिणाम फोन पे, क्रेड, बीलडेस्क, इन्फिबिन यासारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे. हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच 30 जूननंतर वर नमूद केलेल्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बील देताना अडचण येऊ शकते. कारण 30 जूननंतर सर्व क्रेडिट कार्ड्सचे पेमेन्ट फक्त भारत बील पेमेन्ट सिस्टिम (बीबीपीएस) च्या माध्यमातूनच दिले जावेत, अशी सूचना याआधीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली होती. 

....तर बील भरताना येणार अडचण

मिळालेल्या माहितीनुसार ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. या बँकांनी आतापर्यंत पाच कोटींपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना दिलेले आहेत. त्यामुळे फोन पे, क्रेड  तसेच अन्य ॲप्सवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या ॲप्सच्या मदतीने क्रेडिट कार्ड्सचे बील भरता येणार नाही.   

कोणत्या बँकांचे किती कार्ड्स?

इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार एचडीएफसी बँकेने आतापर्यंत दोन कोटी क्रेडिट कार्ड्स जारी केलेले आहेत. आयसीआयसीआय बँकाने 1.7 कोटी क्रेडिट कार्ड्स जारी केलेले आहेत. अॅक्सिस बँकेचे एकूण 1.4 कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. या सर्व बँकांनी आतापर्यंत बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. क्रेड, फेन पे या फिन टेक संस्थानी अगोदरच बीपीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. पण बँकांनीच ही प्रणाली सक्रिय न केलेल्यामुळे 30 जूननंतर या मंचांवरून क्रेडिट कार्ड्सचे बील भरताना अडचण येण्याची शक्यता आहे.

आणखी 90 दिवसांचा वेळ देण्याची मागणी

दरम्यान, हा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण 34 बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. पण आतापर्यंत यातील फक्त 8 बँकांनी बीबीपीएस ही प्रणाली सक्रिय केलेली आहे. बीबीपीएस प्रणाली सक्रिय असलेल्या बँकांमध्ये एसबीआय कार्ड, बीओबी कार्ड, इंडसइंड बँक, फेडरल बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे.  

हेही वाचा :

एका दिवसात शेअर वाढला अन् झाला चमत्कार, अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली सर्वांत मोठी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs DC IPL 2025 : KL राहुल नडला... विराटच्या बंगळुरूवर भारी पडला! RCBचा पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभव, दिल्लीचा विजयाचा 'चौकार'
KL राहुल नडला... विराटच्या बंगळुरूवर भारी पडला! RCBचा पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभव, दिल्लीचा विजयाचा 'चौकार'
रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर 'हा' नेता अजितदादांच्या गळाला
रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर 'हा' नेता अजितदादांच्या गळाला
American Share Market : टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला...
टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला...
सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल
सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar Special Report : Ajit Pawar यांच्य लेकाचा साखरपुडा, संपूर्ण पवार कुटुंबिय एकाच छताखालीTahawwur Rana in India Special Report : तहव्वूर राणाला आणला, मुंबईला न्याय द्या Mumbai Terror AttackST Workers Salary Special Report : मंत्र्यांसाठी I Pad, एसटी कर्मचाऱ्यांचा पगारच कापला! प्रकरण काय?Walmik Karad Beed Case : कराडचा कांगाव, तो मी नव्हेच; सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs DC IPL 2025 : KL राहुल नडला... विराटच्या बंगळुरूवर भारी पडला! RCBचा पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभव, दिल्लीचा विजयाचा 'चौकार'
KL राहुल नडला... विराटच्या बंगळुरूवर भारी पडला! RCBचा पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभव, दिल्लीचा विजयाचा 'चौकार'
रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर 'हा' नेता अजितदादांच्या गळाला
रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर 'हा' नेता अजितदादांच्या गळाला
American Share Market : टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला...
टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला...
सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल
सरकारचे 100 दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही, बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या दारातच पेटवणार मशाल
Gold Rate : अमेरिका-चीनच्या टॅरिफ वादात सोन्याचे दर भडकले, तीन महिन्यात तब्बल 14 हजारांची वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ वॉर,शेअर बाजारात अस्थिरता पण सोने दरात जोरदार तेजी, तीन महिन्यात 14 हजारांची वाढ
Donald Trump Tariff : चीन अमेरिकेत व्यापार युद्धाची ठिणगी पडली, पण दोघांच्या वादात भारताची किनार! डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापात भर, प्रकरण संपूर्ण आहे तरी काय?
चीन अमेरिकेत व्यापार युद्धाची ठिणगी पडली, पण दोघांच्या वादात भारताची किनार! डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापात भर, प्रकरण संपूर्ण आहे तरी काय?
TCS Q4 Result : टीसीएसचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर, नफा घटला, महसूल वाढला, 30 रुपये लाभांश जाहीर
TCS Q4 Result : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर, 30 रुपये लाभांश जाहीर
Crime News : इन्स्टा पोस्टला रिप्लाय देणं पडलं महागात; दोघांची सटकली, तरुणाला एकट्यात पकडलं, परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही म्हणत धुतलं
इन्स्टा पोस्टला रिप्लाय देणं पडलं महागात; दोघांची सटकली, तरुणाला एकट्यात पकडलं, परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही म्हणत धुतलं
Embed widget