GST Council Meeting : भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ मिळणार स्वस्तात, पिठावरील GST 18 वरुन 5 टक्के
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भरड धान्यापासून बनवलेल्या अन्नपदार्थांवर म्हणजेच भरड धान्याच्या पिठावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GST Council Meeting : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भरड धान्यापासून बनवलेल्या अन्नपदार्थांवर म्हणजेच भरड धान्याच्या पिठावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेने या उत्पादनांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. जीएसटी कौन्सिलच्या फिटमेंट कमिटीने यापूर्वी भरड धान्याच्या पीठाला जीएसटीमधून सूट देण्याची शिफारस केली होती. भरडधान्यांपासून तयार केलेल्या उत्पादनांना कोणतेही प्रोत्साहन देण्यास समितीने नकार दिला होता. मात्र, भरड धान्यापासून बनवलेल्या उत्पादनावरील GST चा दर कमी केल्यामुळं हे पदार्थ स्वस्त मिळणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे GST परिषदेची 52 वी बैठक पार पडली.
2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष
भारत 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून साजरे करत आहे. सरकार भरड धान्याचे उत्पादन आणि वापराला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की, पाण्याचा कमी वापर आणि खते कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून बाजरी पिकवता येते. त्यामुळं भरडधान्याचं उत्पादन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, आज झालेल्या या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर दर, धोरणातील बदल आणि प्रशासकीय समस्यांसह जीएसटी शासनाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी GST परिषद वेळोवेळी बैठक घेते. भारताच्या अप्रत्यक्ष कर संरचनेला आकार देण्यात GST परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. हे सुनिश्चित करताना की ते देशाच्या आर्थिक उद्दिष्टांशी संरेखित होते आणि नागरिक आणि व्यवसायांवर कर ओझे कमी करते.
महत्त्वाच्या बातम्या: