एक्स्प्लोर

Popcorn Tax : आता पॉपकॉर्नवर 'फ्लेवर्ड' GST, 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

GST Council Popcorn Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलने पॉपकॉर्नवर 5 ते 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकतीच जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. या बैठकीत पॉपकॉर्नवरही जीएसटी लावण्याचा निर्णय़ घेण्यात आला. हा जीएसटी पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळा असणार आहे. 

थिएटरमध्ये सिनेमा पाहताना आपण आवडीने एक गोष्ट सोबत नेतो ती म्हणजे पॉपकॉर्न. बच्चे कंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत पॉपकॉर्न सगळ्यांचा फेव्हरेट. पण आता याच पॉपकॉर्नसाठी तुम्हाला वेगवेगळे दर मोजावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन वेगवेगळे जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय. 

GST Council Popcorn Tax : पॉपकॉर्नवर वेगवेगळे कर

तुम्ही जर साधे पॉपकॉर्न विकत घेतलात म्हणजे ज्यावर कोणतंही लेबल नसेल किंवा ते पॅक केलेले नसतील तर अशा पॉपकॉर्न्सवर 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.

ही झाली साध्या पॉपकॉर्नची गोष्ट. आता फ्लेवर बदललल्यावर जीएसटी कसा वाढत जातो तेही पाहुयात. समजा तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे, पॅक केलेले आणि त्यावर लेबल असलेले पॉपकॉर्न खरेदी केलात तर त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. अशा पॉपकॉर्न्सवर 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता तिसऱ्या कॅटेगरीचे पॉपकॉर्न. शुगर कन्फेक्शनरी श्रेणीतले पॉपकॉर्न्स ज्यात कॅरेमलसारख्या घटकांचा वापर करण्यात येतो असे पॉपकॉर्न तुमचा खिसा आणखी कापणार आहेत. कारण त्यावर आता तब्बल 18 टक्के जीएसटी लागणार आहे. आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबत स्पष्टीकरण दिलंय. 

जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णय 

1 - जनुकीय उपचारांवर जीएसटी माफ
2 - फोर्टिफाइड तांदळावरील जीएसटीमध्ये पाच टक्क्यांची कपात
3 - वाहनांवरील विम्यावरचा जीएसटी रद्द
4 - बँकेकडून लावल्या जाणाऱ्या दंडावर जीएसटी नाही

पण या सगळ्या निर्णयांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती पॉपकॉर्नचीच. त्यामुळे पिक्चर बघायला जाताना पॉपकॉर्न कोणते खायचे हे तुम्हाला आता जीएसटी बघून ठरवावं लागणार आहे.

ही बातमी वाचा: 

                                                                                         

महत्त्वाच्या बातम्या

UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, किती जणांची सुटका, किती जण बेपत्ता? 
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, किती जणांची सुटका, किती जण बेपत्ता? 

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
Embed widget