एक्स्प्लोर

बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज, कोण, कधी, कसं देणार कर्ज? 

तुम्हाला जर कर्जाची (Loan) गरज असेल आणि बँकांनी कर्ज देणे नाकारले तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, एक सरकारी कंपनी तुम्हाला फक्त 6 मिनिटात कर्ज देत आहे.

Personal Loan News : अनेकदा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. असा वेळी काही ना काही अडचणीमुळं बँका कर्ज (Bank Loan) देत नाहीत. अशा वेळी नागरिकांनी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता तुम्हाला जर कर्जाची (Loan) गरज असेल आणि बँकांनी कर्ज देणे नाकारले तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, एक सरकारी कंपनी तुम्हाला फक्त 6 मिनिटात कर्ज देत आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीने गुरुवारपासून (22 ऑगस्ट) अवघ्या 6 मिनिटांत कर्ज देणे सुरू केले आहे.

दरम्यान, कर्ज मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि माहिती असणे आवश्यक आहे. जसे की खाते एकत्रित करणाऱ्याचा डेटा, केवायसीसाठी डिजीलॉकर किंवा आधार, कर्ज भरण्यासाठी ई-खाते जोडणे, करार करण्यासाठी आधारचे ई-साइन आवश्यक असणं गरजेचं आहे. याची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या अर्ज करु शकता

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि माहिती असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कर्ज घेऊ शकता. तुम्ही Easypay, Paisabazaar, Tata Digital, Invoicepay, Clinic360, Zyapar, Indipay, Tireplex आणि PayNearby सारख्या प्लॅटफॉर्मवरून आदित्य बिर्ला फायनान्स, DMI फायनान्स आणि कर्नाटक बँकेकडून कर्ज घेऊ शकता. आतापर्यंत या 9 कंपन्यांनी ONDC वर नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय MobiKwik, RupeeBoss, Samridh.ai, HDFC बँक, IDFC First Bank, Faircent, Pahal Finance, Fibe, Tata Capital, Kotak Mahindra Bank, Axis Finance, FTCash आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याशी बोलणी सुरू आहेत. प्लॅटफॉर्म कंपनीचे म्हणणे आहे की वैयक्तिक कर्जानंतर, म्युच्युअल फंड आणि विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची त्यांची योजना आहे, जी पुढील 2 महिन्यांत सुरू केली जाऊ शकते.

जीएसटी इनव्हॉइसद्वारे कर्ज देण्याची योजना

कंपनीने सप्टेंबरच्या अखेरीस जीएसटी इनव्हॉइसवर कर्ज देण्याची योजना आखली आहे. ज्यामुळं लहान व्यावसायिकांना फायदा होईल. शेतकऱ्यांना कर्ज देण्याची आणि क्रेडिट कार्ड बनवण्याचीही कंपनीची योजना आहे. कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, या सुविधा जोडल्यानंतर आमच्या प्लॅटफॉर्मवरील दैनंदिन व्यवहारांची संख्या 1 कोटींवर पोहोचेल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दर महिन्याला 4 कोटी व्यवहारांचा आकडा गाठणे अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या:

युवकांसाठी मोठी बातमी! आता मिळणार 20 लाख रुपयांचं मुद्रा कर्ज, अर्थसंकल्पात सीतारामण यांची मोठी घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget