Gold Silver Price Today : आनंदवार्ता! सोनं 440 रुपयांनी स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे दर काय?
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे दर, जाणून घ्या.
Gold Silver Price Today : आज वसूबारस (Vasu Baras) असून दिवाळीच्या (Diwali 2023) पावन पर्वाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 61200 रुपयांवरून कमी होऊन 60,760 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीत सोन्याचे दर 61,350 वरून 60,910 वर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये आज सोनं 61,750 रुपयांवरून 500 रुपयांनी कमी होऊन 61,250 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलं आहे.
सोनं-चांदीचे दर घसरले
गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, आज मुंबईत प्रति तोळे सोन्याचा दर 440 रुपयांनी कमी झाला असून 60,910 रुपये इतका झाला आहे. बुधवारी मुंबईत सोन्याचा दर 61,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 73,200 रुपये आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 K Gold Rate Today)
- मुंबई - मुंबईत सोने 440 रुपयांनी स्वस्त होऊन 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - 440 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - सोने 440 रुपयांनी स्वस्त होऊन 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - सोने 500 रुपयांनी स्वस्त होऊन 61250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)
- नाशिक - 60790 रुपये 440 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)
- नागपूर - 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)
सोन्याची शुद्धता कुठे तपासाल?
दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :