Gold Rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याला झळाळी! सोन्याचे दर 63,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता
Gold Price May Hike : यंदा दिवाळीत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोन्याचे दर 63 हजार रुपयांच्या पुढे जातील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
![Gold Rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याला झळाळी! सोन्याचे दर 63,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता gold prices to reach rs 63000 during diwali says report gold rate hike latest news Gold Rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याला झळाळी! सोन्याचे दर 63,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/c1c5f10998fe812b1f5837fea59679b31699430863432601_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate In Diwali : दिवाळीच्या (Diwali 2023) मुहूर्तावर सोन्याला झळाळी (Gold Price) मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये सोन्याचे दर 63 हजार पार (Gold Rate May Hike) होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, या वर्षी दिवाळी सोन्याच्या दरात वाढ (Gold Price May Hike in Diwali) होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दा दिवाळीत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोन्याचे दर 63 हजार रुपयांच्या पुढे जातील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळी सोनं-चांदी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणम सर्वसामान्यांवर होणार आहे.
यंदाच्या दिवाळीत सोन्याला झळाळी
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, दिवाळीच्या हंगामात सोन्याचा भाव 63,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. या अहवालात असं समोर आलं आहे की, केंद्रीय बँकेची बदलती धोरणे, भू-राजकीय अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये या वर्षी लक्षणीय चढउतार झाले आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी सामान्यत: वाढते, त्यामुळे गुंतवणूकदार या संधींचा फायदा घेत आहेत.
दिवाळीत सोनं महाग होण्याची शक्यता
या अहवालात सोन्याच्या बाजारातील तेजीला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांनी लक्ष वेधलं आहे. जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. सोन्याच्या साठेबाजीमुळे सोन्याच्या किमतीला भक्कम आधार मिळत असून परिणामी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोन्याचे भाव का वाढत आहेत?
चीन, पोलंड, तुर्कस्तान, कझाकस्तान आणि इतर सारख्या देशांकडून जोरदार खरेदी केल्यामुळे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या होल्डिंगमध्ये या वर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. या अहवालानुसार, केंद्रीय बँकांनी चलनविषयक धोरणात आक्रमक पावले उचलली आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हने महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे हे प्रयत्न असले तरी, वाढत्या वेतन, ऊर्जा खर्च आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे चिंता कायम आहे. या परिस्थितीसाठी आर्थिक स्थिरता आणि महागाई नियंत्रण यांच्यात काळजीपूर्वक संतुलन आवश्यक आहे, असंही अहवालात म्हटलं आहे.
सोन्याच्या किमती वाढवण्यात भू-राजकीय घडामोडींचाही मोठा वाटा आहे. संकटकाळात सोन्याकडे सुरक्षित बॅकअप प्लॅन म्हणून पाहिलं जातं. जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे दर वाढतात. सध्या सुरु असलेले इस्रायल-हमास युद्ध, तसेच रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर घटनांमुळे भू-राजकीय घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला आहे. संकटकाळात बचाव म्हणून जागतिक स्तरावर सोन्याच्या आकर्षणात वाढ झाली आहे. परिणामी येत्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)