Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण, तर चांदी झाली महाग; काय आहेत आजचे दर?
Gold Silver Price Today : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय.
![Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण, तर चांदी झाली महाग; काय आहेत आजचे दर? Gold rate today gold and silver price in on 15th march 2022 gold price slightly down today Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण, तर चांदी झाली महाग; काय आहेत आजचे दर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/7e879eac06211efcd111c87e65f0d7af_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Silver Price Today : रशिया-युक्रेनचे युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर असलेला दबाव यामुळे सोन्याच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळते. आज (मंगळवारी) सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 310 रूपयांनी घसरून आजचा सोन्याचा दर 48,100 रूपये झाला आहे.
सोन्या -चांदीचे आजचे ताजे दर :
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,100 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 52,470 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर आज प्रति 10 ग्रॅम 700 रूपये झाला आहे.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Sensex News : आशियाई बाजारात चढउतार, सेन्सेक्स 13 अंकांनी खाली तर निफ्टी 5 अंकांनी घसरला
- Petrol Diesel Price : दिलासादायक मंगळवार, कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशात पेट्रोल-डिझेलचे दर काय?
- Share Market : कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या, शेअर बाजाराचा आलेख पुन्हा तेजीकडे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)