(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price : दिलासादायक मंगळवार, कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशात पेट्रोल-डिझेलचे दर काय?
Petrol-Diesel Rates : भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळं जगात महागाईनं डोकं वर काढलं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांतही सातत्यानं वाढ होत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील किमती मात्र स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price) जारी केले आहेत. आजही देशातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी 9 मार्च रोजी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, इंधन दर यूपीए (UPA) सरकारनं नियंत्रणमुक्त केलं होतं आणि जेव्हा इंधन दर नियंत्रणमुक्त केले जातात, त्यावेळी त्यात मालवाहतूक शुल्क देखील जोडलं जातं.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
देशातील महानगरं | पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) | डिझेलची किंमत (प्रति लिटर) |
मुंबई | 109.98 रुपये | 94.14 रुपये |
दिल्ली | 95.41 रुपये | |
चेन्नई | 101.40 रुपये | 91.43 रुपये |
कोलकाता | 104.67 रुपये | 89.79 रुपये |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).