Mehul Choksi : मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास कोर्टाची परवानगी
Mehul Choksi : मेहुल चोक्सीशी संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्यास पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली आहे.
Mehul Choksi, मुंबई : बँकांची कोट्यावधी रुपयांची फवसणूक करत विदेशात पळ काढणाऱ्या मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय. मेहुल चोक्सीशी (Mehul Choksi) संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिलेली आहे. मेहुल चोक्सीची (Mehul Choksi) 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना (Bank) देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
गीतांजली समूहाची 1968 कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त
मेहुल चोक्सीच्या मुंबईतील (Mumbai) सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील दोन कारखाने आणि गोदामाचा यामध्ये समावेश आहे. गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्त करण्यात आल्याची तपासयंत्रणेने कोर्टात माहिती दिली आहे. ईडीनं देशभरात 136 हून अधिक ठिकाणी छापे मारत गीतांजली ग्रुपशी (Geetanjali Group) संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू, दागिने जप्त केले आहेत. तसेच गीतांजली समूहाची 1968 कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. पीएनबी व इतर बँकांची (PNB Bank) 6097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मेहुल चोक्सीवर आरोप आहे.
ज्या बँकांची फसवणूक केली त्या बँकांना मालमत्ता परत करण्याची प्रक्रिया सुरु
मेहुल चोक्सी याच्यावर पीएनबी आणि इतर काही बँकांची 6 हजार 97 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा उद्योगपती मेहुल चोक्सीवर आरोप आहे. दरम्यान, बँकांना लुटून मेहुल चोक्सीने परदेशात पळ देखील काढलाय. चोक्सीशी संबंधित असणाऱ्या 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात येत होती. मेहुल चोक्सीची ज्या बँकांची फसवणूक केली त्या बँकांना मालमत्ता परत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
मेहूल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिलेली आहे
मेहुल चोक्सीची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरूवात
मुंबईतील सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील दोन कारखाने आणि गोदामाचा समावेश
गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्त करण्यात आल्याची तपासयंत्रणेची कोर्टात माहिती
ईडीनं देशभरात 136 हून अधिक ठिकाणी छापे मारत गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू, दागिने जप्त केलेत
तसेच गीतांजली समूहाची 1968 कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ताही जप्त करण्यात आलीय
पीएनबी व इतर बँकांची 6097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मेहुल चोक्सीवर आरोप
इतर महत्त्वाच्या बातम्या