सोनं भारीच खातंय भाव! सणासुदीच्या काळात आणखी महागलं, जाणून घ्या आजचा भाव काय?
Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वधारला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Rate Today) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजदेखील (24 ऑक्टोबर 2024, गुरुवार) सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीसह 24 कॅटेरच्या सोन्याचा भाव थेट 80 हजाराच्या पुढे गेला आहे. आज एका दिवशी 24 कॅरेटचं सोन 450 रुपयांनी महागलं आहे. या भाववाढीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 8025.3 रुपये प्रति ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 7358.3 रुपये प्रति ग्रॅम जाला आहे. चांदीचा सध्याचा भाव 107200.0 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
कोणत्या शहरात किती भाव?
दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 80253.0 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 23 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 79823.0 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. साधारण आठवड्याभरात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 78293.0 रुपये होता.
दिल्लीमध्ये चांदीचा दर किती?
दिल्लीमध्ये चांदीचा दर 107200.0 रुपये प्रति एक किलोवर पोहोचला आहे. 23 ऑक्टोबर रोजी हा दर 104200.0 रुपये होता. गेल्या आठवड्यात 18 ऑक्टोबर रोजी चांदीचा हा दर 100000.0 रुपये होता.
मुंबईत सोन्याचा भाव किती?
मुंबईत आज सोन्याचा दर 80107.0 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे. काल म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 79677.0 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आठवड्याभरापूर्वी सोन्याचा भाव 78147.0 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
मुंबईत चांदीचा भाव किती?
मुंबईत चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 106500.0 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर 23 तारखेला चांदीचा दर 103500.0 रुपये प्रति किलो होता. आठवड्याभरापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 99300.0 रुपये प्रति किलो होता.
हेही वाचा :
झोमॅटोचा शेअर झापुक झुपूक पळणार! देऊ शकतो 45 टक्क्यांनी रिटर्न्स? जाणून घ्या कधी पैसे गुंतवावेत
बापरे बाप! चांदीचा भाव थेट 1 लाखाच्या पुढे, सोनंही 80 हजारांच्या पार; वाचा आजचा दर काय?