Afcons Infrastructure IPO : शेअर बाजारात आयपीओचा धडाका, अॅफकॉन्स इन्फ्राचा 5430 कोटींचा IPO लवकरच येणार,गुंतवणूकदारांना मोठी संधी
Afcons Infrastructure IPO : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आयपीओ लिस्ट होत आहेत. बांधकाम क्षेत्रातील कंपनी अॅफकॉन्स इन्फ्राचा आयपीओ देखील गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
Afcons Infrastructure IPO मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीओ लिस्ट होत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स, प्रिमियम एनर्जीज, केआरएन हिट एक्सेंजर्स, पीएनजी ज्वेलर्स यासह इतर कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ह्युंदाईचा भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ देखील आज लिस्ट झाला. वारी एनर्जीज या कंपनीच्या आयपीओची देखील जोरदार चर्चा सुरु असून त्याला देखील गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शापूरजी पालोनजी समूहाच्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ देखील गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा आयपीओ 25 ऑक्टोबरपासून खुला होईल.
अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं त्यांच्या आयपीओ संदर्भातील माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार एका शेअरचं मूल्य 440 ते 463 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. हा आयपीओ 25 ऑक्टोबरपासून 29 ऑक्टोबरपर्यंत खुला असेल. अँकर इनवेस्टर्स साठी हा आयपीओ 24 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या आयपीओतून कंपनीकडून 5430 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे.
1250 कोटींच्या नव्या शेअर्सची विक्री
अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून 1250 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे. तर, 4180 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाईल. या कंपनीचे प्रमोटर्स गोस्वामी इन्फ्राटेककडून शेअरची विक्री केली जाणार आहे.गोस्वामी इन्फ्राटेक, शापूरजी पालोनजी अँड कंपनी,फ्लोरेट इनवेस्टमेंटस, हर्मेस कॉमर्स रेनिसान्स कॉमर्स या कंपन्या अॅफकॉन्सच्या प्रमोटर्स आहेत. यांच्याकडे कंपनीची 99 टक्के भागिदारी आहे.
अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 32 शेअर्स असणार आहे. या आयपीओचा एक लॉट घ्यायचा असल्यास गुंतवणूकदारांना कमीतकमी 14816 रुपयांची बोली लावावी लागेल. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना एका शेअरवर 44 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
इनवेस्टर्स गेन या वेबसाईटवरील माहितीनुसार अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या आयपीओवर ग्रे मार्केट प्रीमियमवर सध्या साधारणपणे एका शेअरमागे 10 टक्क्यांची वाढ दिसत आहे. अॅफकॉन्सकडून आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या रकमेपैकी 80 कोटींची रक्कम बांधकाम क्षेत्रातील यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी केला जाणार आहे.
इतर बातम्या :
देशातल्या सर्वांत मोठ्या IPO चा गुलिगत धोका, गुंतवणूकदारांना चटके; सूचिबद्ध होताच मोठी पडझड!
मोठी बातमी! टाटा समूहाचा तब्बल 55 हजार कोटींचा तगडा आयपीओ येणार, पडणार पैशांचा पाऊस?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)