एक्स्प्लोर

गोव्याच्या 'जायफळ टॅफी' आविष्काराला मिळालं पेटंट, शेतकऱ्याला प्रत्येक झाडामागे मिळणार 5600 रुपये 

गोव्याच्या (GOA) 'जायफळ टॅफी' (Nutmeg Taffy) आविष्काराला पेटंट मिळाले आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होणार आहे.

Agriculture News : गोव्याच्या (GOA) 'जायफळ टॅफी' (Nutmeg Taffy) आविष्काराला पेटंट मिळाले आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून, त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते. आता याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

एक टिकाऊ आणि किफायतशीर उत्पादन

गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) मधील डॉ. ए.आर. देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या "जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले  उत्पादन नावाच्या शोधाला पेटंट मिळालं आहे. यासाठी क्रमांक 528119 (अर्ज क्रमांक 201621012414, दिनांक 8 एप्रिल 2016) प्रदान करण्यात आला आहे.

जायफळ, भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक आहे. त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते. कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात.  या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर - सीसीएआरआय ने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशानेएक उपाय विकसित केला आहे. जायफळ बीज कोष टॅफी या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या 80 ते 85 टक्के भाग बनते. कृत्रिम संरक्षकांशिवाय सामान्य तापमानात 12 महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते. यामुळे हे उत्पादन  एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय बनले आहे.

आर्थिक विकासाच्या दृष्टीने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल

या नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे, शेतकऱ्यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेची साधेपणा, त्यासाठी अगदी थोड्या उपकरणांची आवश्यकता आणि व्यावसायिक व्यवहार्यता या वैशिष्ट्यांमुळे कृषी-उद्योजकता, स्वयं-सहायता गट, लघु आणि मध्यम-स्तरीय अन्न उद्योग आणि कृषी-पर्यावरण पर्यटन केंद्रांसह विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी होऊ शकेल. या आविष्काराच्या तंत्रज्ञान हस्तांतरातून गोव्यातील नेत्रावली येथील मेसर्स तनशीकर स्पाइस फार्म आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा या संस्थांनी आधीच यशस्वी व्यापारी उत्पादन सुरू केले आहे. हे नव उत्पादन म्हणजे सामाजिक - आर्थिक विकासाच्या दृष्टीने कृषी नवोन्मेषांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

गोव्यातील आयसीएआर-सीसीएआरआय च्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट युनिटने पेटंट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्थेची बांधिलकी दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Health Tips : स्वयंपाकघरातील जायफळ औषधी गुणांनी परिपूर्ण; रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget