Team India : विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं चाललंय तरी काय?
India vs South Africa 2nd T20I : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 51 धावांनी पराभव पत्करावा लागला.

Gautam Gambhir Team India Suffered Defeat : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची संपूर्ण टीम फक्त 162 धावांवर गारद झाली. या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पक्की प्लेइंग इलेव्हन नाही आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये सुरू असलेले प्रयोग. कोच गौतम गंभीरने अलीकडेच व्हाइट-बॉल क्रिकेटबद्दल बोलताना बॅटिंग ऑर्डर ओव्हररेटेड असल्याचे म्हटले होते. त्याच्या मते ओपनर वगळता बाकी प्रत्येक फलंदाजाने कुठल्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार असले पाहिजे. पण हा प्रयोग केल्यानंतर टीम इंडियाला अपेक्षित यश मिळाले नाही, उलट टीम इंडियाला तोटा झाला.
गंभीरच्या विचारांचा टीमवर उलटा परिणाम?
या सामन्यात गंभीरच्या फ्लेक्सिबल बॅटिंग ऑर्डरच्या धोरणाचा नकारात्मक परिणाम स्पष्ट दिसला. सतत फ्लॉप होत असलेल्या शुभमन गिलला पुन्हा ओपनिंग देण्यात आली आणि तो पहिल्या चेंडूवरच शून्यावर बाद झाला. यानंतर टीमला एका इनफॉर्म फलंदाजाची गरज होती, पण अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. सामान्यतः लोअर ऑर्डरमध्ये खेळणारा अक्षर, दडपणाखाली 21 चेंडूत 21 धावांवरच आऊट झाला. परिणामी धावांचा पाठलाग करताना भारत सुरुवातीलाच मागे पडला.
नियमित तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर उतरला आणि फक्त 5 धावांवर बाद झाला. मागील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला तिलक वर्मा याला यावेळी पाचव्या क्रमांकावर ढकलण्यात आले. तिलकने 62 धावांची झुंजार खेळी केली, पण तेव्हा उशीर झाला होता. तितक्यात शिवम दुबेला आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आले, आणि तोही फक्त 1 धाव करून बाद झाला.
बॅटिंग ऑर्डरमध्ये पुर्णपणे उलथापालथ
धावांचा पाठलाग करताना जी स्थिरता आणि आत्मविश्वास हवा असतो, तो या सामन्यात पूर्णपणे गायब होता. प्रत्येक खेळाडू वेगळ्याच क्रमांकावर उतरल्याने कोणीही आपला नैसर्गिक खेळ खेळू शकला नाही. पॉवरप्ले मध्ये विकेट्स पडत असूनही वरती एकही सेट फलंदाज न पाठवल्याने रनरेट वाढत गेला आणि विकेट्स पडत राहिल्या. हे प्रयोग एखाद्या एकाच सामन्यापुरते मर्यादित नाहीत. मागील काही सामन्यांपासून गिल ओपनिंग, तिलक 3-4-5 वर, हार्दिक 5-6-7 वर तर दुबे 7-8 वर अशा सतत फेरबदल होत आहेत आणि त्याचे परिणामही तसेच दिसत आहे.
टी20 वर्ल्डकपपूर्वी वाढली चिंता
2026 चा टी20 वर्ल्डकप आता अगदी तोंडावर आला आहे. अशावेळी प्रत्येक खेळाडूला त्याचा फिक्स्ड रोल आणि पक्की बॅटिंग पोजिशन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गौतम गंभीरची फ्लेक्सिबिलिटीची कल्पना सिद्धांतात चांगली असली, तरी ती प्रत्यक्षात सतत अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंटला ‘फिक्स्ड रोल’ची प्राधान्यक्रमाने गरज आहे. नाहीतर प्रत्येक पराभवानंतर एकच प्रश्न विचारला जाईल की, "खेळाडूंना त्यांच्या नैसर्गिक क्रमांकावर का खेळवले जात नाही?" आता पाहायचे म्हणजे पुढील सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लॅनसोबत उतरणार? गंभीर पुन्हा हाच प्लॅन पुढे नेतात की यावेळी काही बदल पाहायला मिळणार? हेच खरे कुतूहल आहे.
हे ही वाचा -





















