Weather Update: राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
Weather Update: राज्यात हुडहुडी वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे: उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील अनेक शहरांचे किमान (Weather Update) तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा खाली नोंदविण्यात येत आहे. काल गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये होती. तर पुण्यासह नाशिकचेही तापमान ७ ते ८ अंशावरती पोहोचले आहे. (Weather Update)
राज्यात हुडहुडी वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडीचा कडाका (Weather Update) कायम राहणार असून, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला आहे. उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत पोहचला आहे. अहिल्यानगर मध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Weather Update)
Weather Update: राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ६.६
पुणे: ७.९
जळगाव: ७.०
कोल्हापूर: १४.४
महाबळेश्वर: ११.१
मालेगाव: ८.८
नाशिक: ८.२
सांगली: १२.३
सातारा: १०.०
सोलापूर: १३.२
छत्रपती संभाजीनगर: १०.८
परभणी: १०.४
अकोला: १०.०
अमरावती: १०.२
बुलढाणा: १२.२
गोंदिया: ८.०
नागपूर: ८.१
वर्धा: ९.९
यवतमाळ: १०
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढला
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यभर गारठ्याची तीव्रता जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले असून, विदर्भात ७ ते ८ अंशांची नोंद होत आहे. त्यामुळे या भागांमध्ये पुढील काही दिवस शीतलहरी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Weather Update: पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते
दरम्यान, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, निफाड आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत कोसळले आहे. रात्रीच्या वेळी वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. उत्तरेकडील थंड लहरी कायम राहिल्याने पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे.
Weather Update: निफामध्ये पारा 6.1 अंशावर
नाशिकच्या निफामध्ये पारा 6.1 अंशावर गेला आहे. तर, नाशिकमध्ये देखील तापमान 8 अंशापर्यंत घसरल्याने थंडीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात घट होत आहे. पुढचे दोन-तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत.
पुढील 2 दिवसांत सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील ४८ तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने १४ जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
Weather Update: थंडीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यावर होणार
मराठवाडा: जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर























