Gautam Adani : गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर, 'या' व्यक्तींना टाकलं मागे
Gautam Adani Net Worth : अदानी समूहाचे (Adani Group) संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani Group) जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Gautam Adani Third Richest Person in World : अदानी समूहाचे (Adani Group) संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani Group) जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या (Bloomberg Billionaires Data) नव्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क आणि अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या मागोमाग आहे. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट(Bernard Arnault) यांनाही मागे टाकलं आहे.
गौतम अदानी यांची संपत्ती 137 अब्ज डॉलर्स
जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी 137 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर एलॉन मस्क आहेत. मस्क यांची संपत्ती 251 अब्ज डॉलर्स इतकी आहे, तर अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस 153 अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती
गौतम अदानी यांनी भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती आहे. ब्लूमबर्गच्या मते, एका आशियाई व्यक्तीने जगातील पहिल्या तीन श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि चिनी उद्योजक अलिबाबा समूहाचे (Alibaba Group)मालक जॅक मा (Jack Ma) यांसारख्या इतर श्रीमंत आशियाई व्यक्तींनाही अद्याप या यादीत स्थान मिळवता आलेलं नाही. पण गौतम अदानी यांनी यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी
गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठं बंदर ऑपरेटर असलेल्या अदानी समूहाचे (Adani Group) संस्थापक आहेत. हा समूह देशातील सर्वात मोठा कोळसा व्यापारी (Largest Coal Trader) आहे. 31 मार्च 2021 पर्यंत अदानी एंटरप्रायझेसने 5.3 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. ब्लूमबर्ग प्रोफाइलमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची माहिती प्रसिद्ध केली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Reliance Jio 5 G: मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार
- Bill Gates Net Worth : बिल गेट्स यांच्याकडून 20 अब्ज डॉलर्स दान, श्रीमंताच्या यादीतील स्थान घसरलं