एक्स्प्लोर

पगार 1 लाखाच्या पुढे, पदांची संख्या 261, युवकांना GAIL India मध्ये नोकरीची मोठी संधी

GAIL India Limited ने वरिष्ठ अभियंता आणि इतर पदांसाठी भरती प्रकिया सुरु केली आहे.  यामध्ये, पात्र आणि इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

GAIL Recruitment 2024:   नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे.  GAIL India Limited मध्ये वरिष्ठ अभियंता आणि इतर पदांसाठी भरती प्रकिया सुरु केली आहे.  यामध्ये, पात्र आणि इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. GAIL India Limited द्वारे एकूण 261 पदांची भरती प्रकिया सुरु झाली आहे. 

विविध पदांसाठी रिक्त जागा 

या भरतीद्वारे एकूण 261 विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ अभियंत्याच्या 98 पदांचा समावेश आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 130 पदे आणि अधिकाऱ्यांच्या 33 पदांचाही समावेश आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या भरतीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता आवश्यक आहेत. बहुतांश पदांसाठी अभियांत्रिकी पदवी अनिवार्य आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादाही वेगळी ठेवण्यात आली आहे. पदांनुसार, वयोमर्यादा 28 ते 45 वर्षे असावी.

निवड प्रक्रिया कशी होणार?

सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवारच पुढील निवड प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. उमेदवारांच्या संख्येनुसार, उमेदवारांना एकाच टप्प्यातून किंवा अनेक टप्प्यातील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. निवड प्रक्रियेमध्ये गट चर्चा आणि/किंवा मुलाखत यांचा समावेश असेल. वरिष्ठ अधिकारी (F&S), अधिकारी (सुरक्षा) आणि अधिकारी (राजभाषा) वगळता सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया सारखीच असेल. त्याच वेळी, वरिष्ठ अधिकारी (अग्नी आणि सुरक्षा) आणि सुरक्षा अधिकारी यांच्या निवड प्रक्रियेमध्ये पीईटी आणि मुलाखतीचाही समावेश होतो.

कसा करावा अर्ज?  

उमेदवारांनी प्रथम गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन GAIL Recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा. परीक्षा निवडा, PID आणि पासवर्ड टाका. यानंतर अर्ज फी भरा आणि भविष्यातील वापरासाठी कागदपत्रे डाउनलोड करा. दरम्यान, UR/EWS/OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरावी लागेल. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याबी प्रकारची फी भरावी लागणार नाही.

दरम्यान, पात्र असलेल्या युवकांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर आहे. त्यापूर्वी अर्ज करणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या:

ITBP Recruitment 2024 : आयटीपीबीमध्ये 526 जागांवर भरती,21 हजारांपासून 1 लाख 12 हजारांपर्यंत पगाराची संधी 

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Embed widget