एक्स्प्लोर

Flipkart मध्ये 'बन्सल' युगाचा अंत; सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बंसल यांनीही विकले उर्वरित स्टेक

Flipkart Co-Founder: 2018 मध्ये फिल्पकार्टचे अधिग्रहण केल्यानंतर, बिन्नी बन्सल यांनी कंपनीतील एक छोटासा हिस्सा राखून ठेवला होता, परंतु आता त्यांचा उर्वरित 1-1.5 टक्के हिस्साही त्यांनी विकला आहे.

Flipkart Co-Founder: एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करून फ्लिपकार्टला (Walmart Flipkart Deal)  मोठ्या उंचीवर नेणारे बन्सल ब्रदर्स म्हणजेच, फ्लिपकार्टची ओळख. पण आता फ्लिपकार्टमधील (Flipkart) याच बन्सल ब्रदर्सचा काळ संपला आहे.  सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममधील आपले उर्वरित स्टॉकही विकले आहेत. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टचे (Flipkart Deal) सह-संस्थापक बिन्नी बन्सल (Binny Bansal) आणि कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार Accel आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट यांनी वॉलमार्टला आपापला हिस्सा विकून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता फ्लिपकार्टमधील बन्सल ब्रदर्सचं युग पूर्णपणे संपलं आहे. 

Traxon नं दिलेल्या वृत्तानुसार, 2008 मध्ये जेव्हा Accel आणि Tiger Global Management यांनी कंपनीचे स्टॉक घेतले, तेव्हा सुरुवातीला या दोघांकडेही Flipkart मधील 20 टक्क्यांहून अधिक भागभांडवल होतं, परंतु 2018 मध्ये वॉलमार्टनं फ्लिपकार्टमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यापूर्वी हळूहळू त्यांची भागीदारी कमी केली. ही भागीदारी सुमारे 6 टक्क्यांपर्यंत कमी झाली.

वॉलमार्टनं 2018 मध्ये विकत घेतलं भागभांडवल 

वॉलमार्टनं 2018 मध्ये फ्लिपकार्टमधील कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला. अधिग्रहणानंतरही, Accel नं अलीकडेपर्यंत कंपनीतील 1.1 टक्के हिस्सा राखून ठेवला. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, 2023 मध्ये एक्सेल फ्लिपकार्टमधून बाहेर पडली आहे. कंपनीनं गेल्या काही वर्षांत सुमारे 60-80 डॉलर मिलियनच्या गुंतवणुकीवर 25-30 पट परतावा दिला आहे.

त्याचप्रमाणे, वॉलमार्टच्या अधिग्रहणानंतर टायगर ग्लोबलची देखील फ्लिपकार्टमध्ये फारच कमी भागीदारी होती, परंतु वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सुमारे 3.5 डॉलर अब्ज नफा घेतल्यानंतर आता कंपनीतून बाहेर पडली आहे. Flipkart चे सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी आधीच 2018 मध्ये वॉलमार्टला त्यांचे संपूर्ण स्टेक विकले होते, तर त्यांचे भागीदार आणि फ्लिपकार्टचे दुसरे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी वॉलमार्टच्या अधिग्रहणानंतरही फ्लिपकार्टमधील एक छोटासा स्टेक कायम ठेवला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिन्नी बन्सल यांनी आता फ्लिपकार्टमधील त्यांचे उर्वरित स्टेकही वॉलमार्टला विकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टच्या स्थापनेपासूनच बाहेर पडण्यापर्यंत सुमारे 1-1.5 डॉलर अब्ज कमावले आहेत. हा करार सुमारे 35 डॉलर बिलियनला झाला आहे. "बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टमधील त्यांचे उर्वरित 1-1.5 टक्के स्टेक विकले आहेत, परंतु ते कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणार आहेत.", अशी माहिती एका सुत्रांनी दिली आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LPG Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! 100 रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर, पाहा तुमच्या शहरांतील दर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget