(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LPG Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! 100 रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर, पाहा तुमच्या शहरांतील दर
LPG Cylinder Price: देशाची राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतींत 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
LPG Cylinder Price: भारतीय तेल कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस (Domestic LPG Cylinders) आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या (Commercial Cylinder) किमती अपडेट केल्या आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत बदल करण्यात आला आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinders) दरांत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1680 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी करण्यात आलेल्या वाढीसह व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1780 रुपयांवर पोहोचली होती.
LPG व्यावसायिक सिलेंडरची किंमत कोणत्या शहरात किती?
कोलकातामध्ये, LPG 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 93 रुपयांनी कमी झाली असून त्यानंतर आता व्यावसायिक सिलेंडर 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलेंडर आता 1640.50 रुपयांना विकला जाईल, जो 4 जुलैला वाढून 1733.50 रुपये प्रति सिलेंडर झाला होता. तसेच, चेन्नईमध्ये एलपीजी 19 किलो सिलेंडरची किंमत 1852.50 रुपयांवर पोहोचली आहे, जी 4 जुलै रोजी 1945 रुपयांपर्यंत वाढली होती.
घरगुती गॅसच्या किमती 'जैसे थे'
मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. देशाच्या राजधानीत घरगुती गॅसची किंमत 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. तर मुंबईत LPG 1102.50 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरांतही बदल नाही
केवळ घरगुती गॅसच्या किमतीतच नाही तर काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बराच काळ बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कधी वाढल्या होत्या?
सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती. तर जुलैमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर सात रुपयांनी वाढवला होता. व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी झाली होती.
तुमच्या शहरातील एलपीजीची किंमत कशी चेक कराल?
तुम्हाला एलपीजीच्या किमतींची अद्ययावत यादी पाहायची असल्यास, तुम्ही iocl.com/prices-of-petroleum-products लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला LPG किमतींसह जेट इंधन, ऑटो गॅस आणि केरोसीन यांसारख्या गोष्टींचे अद्ययावत दर पाहायला मिळतील.