पगार, वय आणि निवृत्ती! 60 वर्षांनंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत? वाढत्या महागाईच्या तुलनेत कसं कराल नियोजन?
Financial Planning : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळं पैशाचे मूल्य देखील कमी होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आत्तापासूनच पैशांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
Financial Planning : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळं पैशाचे मूल्य देखील कमी होत आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये असतील तर पुढच्या 30 वर्षात त्याची किंमत 23 लाख रुपयेच असणार आहे. कारण महागाई वाढत आहे, त्याप्रमाणात पैशांचे मूल्य कमी होत आहे. दरम्यान, तुम्ही निवडत्त झाल्यानंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? वाढत्या महागाईच्या तुलनेत तुम्ही नेमकं कसं कराल नियोजन?
समजा आज तुमचे वय 40 वर्षे आहे आणि तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपये आहे. बहुतेक लोक वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. आजच्या युगात लोक वयाच्या 50 व्या वर्षीही निवृत्तीची योजना आखतात. परंतु बहुतेक भारतीय वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात, त्यामुळे तुम्हाला अजून 20 वर्षे बाकी आहेत. आता तुम्हाला तुमच्या गरजेनुसार अंदाज लावण्यास सांगितले जाते की तुम्हाला आता निवृत्त व्हायचे असेल किंवा समजा तुमचे वय 60 आहे, तर तुम्हाला सेवानिवृत्ती म्हणून किती रक्कम लागेल? जर सध्याचे वेतन 1 लाख रुपये असेल, तर नियमानुसार, चालू पगाराच्या 100 पट निवृत्ती निधी म्हणून गणले जाते. त्यानुसार आता एक कोटी रुपयांचा सेवानिवृत्ती निधी तुमच्याकडे असायला हवा.
20 वर्षांनी म्हणजे 60 वर्ष वय झाल्यावर तुमच्याकडे 3.20 कोटी हवेत
आता यानुसार तुम्ही मोजू शकता की तुम्ही आता 40 वर्षांचे असाल आणि तुमचा पगार 1 लाख रुपये असेल, तर तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला किती रक्कम लागेल. रिटायरमेंट कॅल्क्युलेटरनुसार, 20 वर्षांनंतर, आजच्या महागाईचा विचार करता, तुमच्याकडे किमान 3.20 कोटी रुपये असले पाहिजेत. म्हणजे आता जे 1 कोटी रुपये आहेत ते 20 वर्षांनंतर 3.20 कोटी रुपये होईल. यामध्ये वार्षिक 6 टक्के महागाई दराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
किती करावी लागेल गुंतवणूक?
40 वर्षाच्या व्यक्तीला, ज्याचा मासिक पगार 1 लाख रुपये आहे, त्याला 20 वर्षांनंतर 3.20 कोटी रुपये मिळण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी त्याला मासिक 32400 रुपयांची SIP करावी लागेल. यामध्ये 12 टक्के परतावा मिळण्याचा अंदाज आहे. जो आजच्या काळात शक्य आहे. जर परतावा 15 टक्के असेल, तर पुढील 20 वर्षांसाठी फक्त 21420 रुपयांची मासिक SIP करावी लागेल. हे मोजण्यासाठी तुम्ही अनेक वेबसाइट्सची ऑनलाइन मदत घेऊ शकता.
तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आणि वयानुसार तुमचा सेवानिवृत्ती निधी काढू शकता
दरम्यान, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आणि वयानुसार तुमचा सेवानिवृत्ती निधी काढू शकता. तुम्हाला दरमहा किती बचत करायची आहे हे देखील पाहू शकता. तुमचे उत्पन्न 50 हजार रुपयांपेक्षा कमी असो किंवा लाखात, कारण प्रत्येकाला निवृत्त व्हायचे असते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे खर्च असतात. वृद्धापकाळात, वैद्यकीय खर्चावर सर्वाधिक खर्च होतो, त्यानुसार योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.