(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमच्या आर्थिक नियोजनात झाली आहे मोठी चूक, 'हे' आहेत संकेत
Financial Planning: एखादी व्यक्ती अचानकपणे कर्जाच्या विळख्यात अडकत नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही कर्जात अडकू शकता.
Financial Planning: अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांकडून आर्थिक नियोजनही करण्यात येते. मात्र, कधी तरी त्यांनाही मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी तरी लहान मोठ्या कारणांसाठी कर्ज काढल्यानंतर त्याच्या जाळ्यात अनेकजण अडकतात. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागते. आर्थिक नियोजन फसले आहे , अथवा आर्थिक संकटाची चाहुल देणारे काही संकेत मिळतात. हे संकेत ओळखून तातडीने पावले उचणे गरजेचे असते,
EMI:
तुमच्या उत्पन्नाच्या 50 टक्क्यांहून अधिक रक्कम EMI मध्ये जात असेल, तर तुम्ही ताबडतोब सतर्क होणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही लहान कर्ज घेतल्यानंतर मोठे कर्ज घेता. त्याशिवाय एखाद्या ऑफरला भुलून आवश्यकतेपेक्षाही अधिक खरेदी केली जाते. त्यावेळी तुम्हाला पगाराचा एक मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी गमवावा लागतो. मासिक पगाराचा अधिकाधिक 30 ते 40 टक्के भाग हा EMI वर खर्च व्हावा.
बचत:
जर तुमची बचत होत नसेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तुम्हाला निकटच्या काळात कर्ज घ्यावे लागू शकते. तुमच्या महिन्याच्या उत्पन्नापैकी 10 ते 20 टक्के भाग हा बचतीवर खर्च व्हावा. तुमच्या मासिक उत्पन्नाची सगळीच रक्कम खर्च होत असेल तर तुम्ही आर्थिक संकटात जाण्याचा मोठा धोका आहे.
क्रेडिट कार्डचे किमान बिल
क्रेडिट कार्डचे तुम्ही कमीत कमी असलेले बिल देत असाल तर ही सवय तुम्हाला कर्जाच्या विळख्यात आणू शकते. क्रेडिट कार्डचे बिल 90 टक्के भरत असाल तर पुढील बिलिंगमध्ये पूर्ण रक्कमेवर बँक व्याज वसूल करेल. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिल एकाच वेळी भरणे कधीही चांगले आहे.
हे देखील लक्षात ठेवा
एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेऊ नका. ही सवय तुम्हाला कर्जाच्या विळख्यात अडकवू शकते. तुम्ही निर्धारीत केलेल्या खर्चांशिवाय इतर शॉपिंग अथवा इतर ठिकाणी प्रवास, पर्यटन करायचे असल्यास तो खर्च बचतीच्या पैशातून करावा. त्यासाठी कर्ज घेऊ नये.
EMI आणि बिल पेमेंट वेळेवर द्यावे. जर तुम्ही कर्जाचे हप्ते आणि बिल पेमेंट वेळेवर करण्यास चुकत असाल तर तुम्ही कर्जात अडकू शकता.