EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
EPFO : इपीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच खातेदारांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.
नवी दिल्ली : देशभरातील खासगी क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची खाती ईपीएफओमध्ये काढली जातात. या खात्यात त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर लाभ मिळावेत म्हणून सेवेत असताना काही रक्कम जमा केली जाते. निवृत्तीपूर्वी काही कारणांसाठी देखील रक्कम खात्यातून काढता येते. पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
तुम्ही जर पहिल्यांदा एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल तर ती कंपनी इपीएफ अंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे पाहावं लागणार आहे. जर कंपनी नोंदणीकृत असेल तर फॉर्म 11 भरावा लागेल. हा अर्ज भरताना पूर्ण माहिती, बँकेच्या खात्याची माहिती, आधार क्रमांक आणि पॅन कार्डची माहिती भरावी लागेल.
पीएफ मध्ये नोंदणी होताच तुमचा यूएएन क्रमांक सक्रीय करा.यामुळं तुम्ही इपीफओच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता. इपीएफओच्या सेवांचां लाभ घेण्यासाठी तुमच्या यूएएनमध्ये आधार, पॅन, बँक खाते आणि मोबाइल नंबर तुमच्या कंपनीकडून भरुन घ्या.
तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांकाप्रमाणं इपीएफमध्ये नोंदवलं आहे याची खात्री करुन घ्या, काही बदल असल्यास संयुक्त घोषणपत्र देत दुरुस्ती करुन घ्या
तुम्ही तुमच्या पीएफ योगदानातील शिल्लक रक्कम नियमितपणे तपासून घ्या. काही विसंगती आढळल्यास तुमच्या कंपनीच्या व्यवस्थापन किंवा इपीएफओला कळवा.
जेव्हा तुम्ही नोकरी बदलाल तेव्हा तुमच्या पीएफ खात्यांना नव्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करावेत. जर तुम्हाला दोन यूएएन क्रमांक मिळाले असल्यास नव्या यूएएन क्रमांकावर वर्ग करावेत.
तुमच्या खात्यामध्ये ई नामांकन देखील दाखल करणं आवश्यक आहे.यूएएन पोर्टल वापरण्यात अडचणी येत असल्यास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी किंवा इपीएफओला कळवा.
खोट्या वेबसाईट आणि फिशींग मेलपासून सावध राहा. पीएफ खात्याला आर्थिक गरजा पूर्ण करणारं बँक खातं समजू नका. निवृत्तीच्या काळात तुम्हाला आर्थिक सुरक्षा पुरवण्यासाठी याचा उपयोग होईल. खात्यातून रक्कम वैद्यकीय कारण, घर खरेदी,घर बांधणी, विवाह या कारणासाठी काढता येईल.
इपीएफ खातेदारांनी त्यांच्या खात्यामधील माहिती अपडेट ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा पैशांची गरज असेल आणि कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तेव्हा पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करा.
याशिवाय इपीएफ खातेदारांनी त्यांच्या खात्याच्या लॉगीन डिटेल्स कुणाला देऊ नयेत. ओटीपी देखील दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करु नये.
इतर बातम्या :