एक्स्प्लोर

EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर; सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज जमा

EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर. सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज पीएफ खात्यांमध्ये जमा करण्यात आलं आहे.

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच, ईपीएफओने (EPFO) आपल्या सब्सक्राइबर्सना आनंदाची बातमी दिली आहे. EPFO ने 23.34 कोटी खातेदारांच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज जमा केले आहे. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्के व्याजदर ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता हे व्याज EPFO खातेधारकांना खात्यात जमा करण्यात आलं आहे. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने काल एक ट्वीट करत ही माहिती दिली. ट्वीटमध्ये म्हटलंय की, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.50 व्याजदरासह 23.34 कोटी खातेधारकांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे. जर तुम्ही EPFO चे खातेधारक असाल, तर तुम्ही आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की, नाही ते तपासू शकता. जाणून घेऊया PF खात्यातील रक्कम तपासण्याची सोपी प्रक्रिया... 

जर तुम्हाला तुमच्या पीएमधील बॅलन्स चेक करायचा आहे तर आता तुम्ही आपल्या मोबाईलवरुन तो चेक करु शकता. पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी चार पर्याय आहेत. चार पद्धती वापरुन आपण आपला पीएफमधील बॅलन्स काही क्षणात चेक करु शकतो. या चार पर्यायांचा वापर करुन आपण घरबसल्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम किती आहे हे चेक करु शकता.  (How much balance is in your PF account find out in minutes by these 4 ways)

पीएफ बॅलन्स चेक करण्याचे चार प्रकार :

  • EPFO वेबसाईट वरुन
  • एसएमएसच्या माध्यमातून
  • मिस कॉल देऊन
  • UMANG App वरुन 

EPFO वेबसाईवरुन असा कराल बँलन्स चेक 

EPFO च्या https://www.epfindia.gov.in या  वेबसाईटवर लॉग इन करा.  ई-पासबुक वर क्लिक करा
ई-पासबुक वर क्लिक केल्यावर https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या नवीन पेजवर याल.
तिथं आपला  UAN नंबर आणि पासवर्ड तसेत कॅप्चा भरा
सर्व डिटेल्स भरल्यावर एक नवं पेज ओपन होईल. तिथं मेंबर आयडी सिलेक्ट करा. 
तिथं ई-पासबुकच्या माध्यमातून आपला ईपीएफ बॅलन्स पाहू शकाल 

SMS च्या माध्यमातून

आपण एसएमएसच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करु शकतो. 
यासाठी आपला मोबाईल नंबर  EPFO सोबत रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे.  
रजिस्टर्ड  मोबाइल नंबरवरुन EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करावं लागेल.
आपल्याला बॅलन्स संबंधी डिटेल्स हिंदीसह अन्य भाषांमध्ये मिळतील. आपल्याला ज्या भाषेत माहिती हवी आहे त्या भाषेचा कोड द्यावा लागेल.  

मिस कॉलच्या माध्यमातून

पीएफ अकाऊंटशी जो नंबर लिंक केला आहे त्या रजिस्टर नंबर वरुन 011-22901406 या नंबरवर मिस-कॉल द्या
मिस-कॉल दिल्यानंतर लगेच आपल्या रजिस्टर नंबरवर मॅसेज येईल यात  PF Balance ची माहिती मिळेल. 

UMANG App च्या माध्यमातून

आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरुन Umang App डाऊनलोड करा
आपला फोन नंबर रजिस्टर करा आणि अॅपमध्ये लॉगिन करा 
टॉप वर डाव्या बाजूला दिलेल्या मेन्यू ऑप्शनमध्ये जाऊन 'Service Directory' मध्ये जा
तिथं EPFO हा पर्याय दिला असेल, त्यावर क्लिक करा 
तिथं View Passbook मध्ये गेल्यानंतर आपला UAN नंबर आणि OTP टाकून बॅलन्स पाहता येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Embed widget