PF Withdrawal : अत्यंत महत्त्वाचं! पीएफ अकाउंटचा 'हा' नंबर शेअर कराल, तर पश्चाताप करण्याची वेळ येईल
PF Balance : जर तुमचे पीएफ अकाऊंट (PF Account) असेल तर कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करु नका. अन्यथा तुमच्या अकाऊंटवरचे सर्व पैसे गायब होतील असा इशारा देण्यात आला आहे.
PF Balance : जर तुमचेही EPF खाते (EPF Account) असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. चुकूनही हे नंबर्स कोणासोबतही शेअर करु नका. ईपीएफओनं सर्व खातेधारकांना अलर्ट केलं आहे की, आपली वैयक्तिक माहिती आणि काही नंबर्स कोणासोबतही शेअर करु नका. EPFO नं यासंदर्भात एक ट्वीट करुन सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ईपीएफओचं ट्वीट
EPFO नं आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर लिहिलंय की, ईपीएफओ कधीही खातेधारकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती, जसं की, आधार कार्ड क्रमांक, यूएएन नंबर, बँक अकाउंट डिटेल्स आणि ओटीपी मागत नाही. जर तुम्हाला कोणीही फोन केला किंवा सोशल मीडियावर EPFO च्या नावानं कोणत्याही स्वरुपाची माहिती मागत नाही. त्यामुळं सावध राहा आणि आपली वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करु नका.
सरकारच्या वतीनं मिळतं व्याज
दरम्यान, कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचा प्रॉविडंट फंडामध्ये जमा झालेली रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. या रकमेच्या आधारावरच तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची प्लानिंग करु शकता. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे साठवू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रॉविडंट फंडावर सरकारकडून व्याजही दिलं जातं.
वैयक्तिक माहिती शेअर करु नका
EPFO खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर आपले PF Account असेल तर त्या संबंधी कोणतीही महत्वाची माहिती कुणाशीही शेअर करु नका असं आवाहन EPFO च्या वतीनं करण्यात आलं आहे. एखादी महत्वाची माहिती, किंवा आधार नंबर, पॅन नंबर, यूएन अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अशी कोणी मागणी केल्यास ती देऊ नये अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे गायब होण्याची शक्यता आहे असं EPFO ने म्हटलं आहे.
EPFO त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवर या संबंधी एका ट्वीटच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, आधार नंबर, पॅन नंबर, बँक डिटेल्स, बँक अकाऊंट डीटेल्स आणि ओटीपी या संबंधी माहिती EPFO कडून कधीही मागण्यात येत नाही. तशा प्रकारचा कोणताही कॉल केला जात नाही. जर अशा प्रकारचा कोणताही कॉल आला तर सावध रहावं आणि कोणतीही डीटेल्स शेअर करु नये.
PF वर 8.5 टक्के व्याज
काही दिवसांपूर्वीच EPFO नं आर्थिक वर्ष 2020-2021 चं व्याज पीएफ खातेधारकांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलं आहे. सरकारनं आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 8.5 टक्के दरानं व्याज ट्रान्सफर केलं आहे. तुम्ही एसएमएस किंवा मिस्ड कॉलमार्फत बँलेंज चेक करु शकता. EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज दर समान होता. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं. त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसीमध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.
कोट्यवधी ग्राहकांची PF खाती
EPFO मध्ये सध्या देशातील कोट्यवधी लोकांची खाती आहेत. जवळपास 6 कोटींहून अधिक ग्राहक दर महिन्याला आपल्या पगारातील काही भाग पीएफ (PF) खात्यामध्ये जमा करतात. ज्यामुळे भविष्यात ते पेन्शनचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :