(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ पुढच्या आठवड्यात, ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद
Electronics Mart India: कंझ्युमर ड्युरेबल्स किरकोळ साखळी असलेला इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया देखील आपला आयपीओ लाँच करत आहे. कंपनीचा आयपीओ 4 ऑक्टोबरला उघडेल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्वासाठी खुला असणार आहे.
Electronics Mart India IPO: कंझ्युमर ड्युरेबल्स किरकोळ साखळी असलेला इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया (Electronics Mart India) देखील आपला आयपीओ लाँच करत आहे. कंपनीचा आयपीओ 4 ऑक्टोबरला उघडेल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्वासाठी खुला असणार आहे. हा आयपीओ 3 ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. या आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. विक्रीसाठी कोणतीही ऑफर नसेल आणि 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी केले जातील.
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया आयपीओसाठी किंमत बँड 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. आयपीओअंतर्गत शेअर्सचे वाटप १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स येतील. 17 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात शेअर्सची लिस्टिंग अपेक्षित आहे. या आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून IIFL सिक्युरिटीजचे सल्लागार आनंद राठी आणि जेएम फायनान्शियल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव
एका अहवालानुसार, Electronics Mart India च्या आयपीओ पैकी 50% पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. आयपीओमधील 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बिगर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के राखीव ठेवण्यात आली आहे.
भांडवलाचा वापर कुठे?
आयपीओमधून 500 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. यापैकी 111.44 कोटी भांडवली खर्चासाठी आणि 220 कोटी खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरले जातील. त्याचबरोबर कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी 55 कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत.
ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची प्रीमियमवर ट्रेडिंग
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रिमियमवर व्यवहार करत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 20 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. त्यानुसार या आयपीओचे शेअर्स 79 रुपयांना बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. दरम्यान लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा आहे की, जर आयपीओचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियमवर ट्रेडिंग होत असतील, तर त्यांची शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग देखील प्रीमियमवर असावी असे आवश्यक नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Small Saving Schemes Rate Hike : पोस्ट ऑफिस, जेष्ठ नागरिक आणि किसान विकास पत्र योजनावरील व्याजदरात वाढ
क्रेडिट-डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 1 ऑक्टोबरपासून नवा नियम; आर्थिक व्यवहार सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल