Small Saving Schemes Rate Hike : पोस्ट ऑफिस, जेष्ठ नागरिक आणि किसान विकास पत्र योजनावरील व्याजदरात वाढ
Small Saving Schemes Rate Hike : दोन वर्षानंतर छोट्या बचत योजनावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
![Small Saving Schemes Rate Hike : पोस्ट ऑफिस, जेष्ठ नागरिक आणि किसान विकास पत्र योजनावरील व्याजदरात वाढ good news finance minister hikes interest rate on kisan vikas patra scss and post office deposit schemes before rbi rate hike utility news in marathi Small Saving Schemes Rate Hike : पोस्ट ऑफिस, जेष्ठ नागरिक आणि किसान विकास पत्र योजनावरील व्याजदरात वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/e94cd7837817d87bf94b034fb856471f1663761631605279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Small Saving Schemes Rate Hike: किसान विकास पत्र (KIsan Vikas Patra), पोस्ट ऑफिसच्या बचत योजना ( Post Office Deposit Schemes) आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना ( Senior Citizen Saving Schemes) यासह इतर स्मॉल सेव्हिंग योजनामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. अर्थ मंत्रालयाने ( Finance Ministry) आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पीपीएफ ( PPF) सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samridhi Yojana) आणि एनएससी ( NSC) यावरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
व्याजदरात किती वाढ?
किसान विकास पत्रवरील व्याज दरामध्ये 6.9 टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात आली आहे. याआधी किसान विकास पत्रामधील गुंतवणूक 124 महिन्यानंततर मॅच्युअर होत होती. पण आता 123 महिन्यानंतर मॅच्युअर होईल.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनावरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरुन 7.6 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर 6.6 टक्क्यांवरुन 6.7 टक्के करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनावरील व्याजदरात वाढ -
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. तर तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 5.8 टक्के करण्यात आले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एक वर्षाच्या मुदत ठेव योजनावर 5.5 व्याज देण्यात येतेय. त्याप्रमाणेच पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरातही कोणताही बदल करण्यात आला नाही. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनावर 5.8 टक्के व्याज मिळते.
PPF, सुकन्या योजनावरील व्याजदार बदल नाही -
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहिसाठी आर्थ मंत्रालयाने पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनावरील व्याजदरात कोणताही बदल केला नाही. पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) यावर 7.1 टक्के, NSC म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के, सुकन्या समृद्धी योजनावर (Sukanya Samridhi Yojna) 7.6 टक्के व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसमधील सेविंग डिपॉजिट खात्यामध्ये गुंतवणूकीवरील व्याजदरातही कोणताही बदल करण्यात , आला नाही. यावर चार टक्के व्याज मिळेल.
दरम्यान2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून आतापर्यंत दहा तिमाहीमध्ये छोट्या बचत योजनावरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. आरबीआयने यादरम्यान तीन वेळा रेपो रेट वाढवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)