EPFO : PF खातेधारकांना मिळणार 7 लाखापर्यंतचा विमा, असा करा अर्ज
EDLI Insurance cover : EPFO विमा योजनेअंतर्गत नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गुंतवणूक करणे आता सर्वांनाच अधिक सोईचे ठरेल.
EDLI Insurance cover : कोणत्याही खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून दरमहिना पीएफ कापला जातो. जर तुमच्याही पगारातून अशा प्रकारचा पीएफ कापला जात असेल तर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. या ईपीएफओ योजनेत खातेधारकांना विमा संरक्षणाची सुविधा प्राप्त होते. त्यांना कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI विमा संरक्षण) मार्फत ही सुविधा मिळते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते. आधी यासाठीची मर्यादा ही 6 लाख रुपये इतकी होती पण आता सरकारने ती विमा रक्कम 7 लाख इतकी वाढवली आहे.
EPFO विमा पॅालिसीचे नवीन नियम काय आहेत?
ईपीएफओ (EPFO)ही एक कर्मचारी भविष्य निधी संघटना आहे. ही कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाची सुविधा देते. जीवन विमा डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत समाविष्ट असलेली योजना आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या वेळेस विमा रक्कमेची किंमत 6 लाख होती.आता मात्र या विमा रक्कमेची किंमत जास्तीत जास्त 7 लाख करण्यात आली आहे.
या विमा पॅालिसीअंतर्गत ज्यांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे त्यांना कोणत्याही वेगळ्या प्रकारचा पीएफ हफ्ता भरावा लागत नाही. या विमा योजनेअंतर्गत, खातेदाराच्या मृत्यूनंतर किंवा अपंगत्वानंतर, त्याच्या पत्नी/पती किंवा आईला 25 वर्षापर्यंतच्या मुदतीत दैनंदिन वेतनातून 90 टक्के इतके पेन्शन दरमहा प्राप्त होईल. याशिवाय मुलीच्या लग्नाच्या वेळीही आपल्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1. सर्वप्रथम EPFO च्या ॲाफिशिअल वेबसाईटला भेट द्या.
2. त्यानंतर ‘Services' या पर्यायावर क्लिक करा.
3. नंतर ‘For Employees' सेक्शनवर क्लिक करा.
4. आपल्यासमोर ‘E-Sewa Portal' उघडलेले दिसेल. समोर आलेल्या ‘Manage’ ॲाप्शन यामध्ये E-Nomination या पर्यायावर क्लिक करावे.
5. त्यानंतर समोर आलेल्या Yes बटणावर क्लिक करून ‘Add Family Details' यावर जावे.
6. समोर नमूद केलेले Nomination Details वर जाऊन पैशासंबंधीची व इतर वैयक्तिक माहिती तिथे प्रविष्ट करावी.
7. नंतर ‘Save EPF Nomination' वर क्लिक करावे. समोर ‘E-sign' मध्ये आपला नंबर नोंद केल्यास आपल्याला OTP प्राप्त होईल.
8. तो OTP तिथे प्रविष्ट करून झाल्यानंतर आधार कार्ड वरील 16 क्रमांकी नंबर तिथे टाकावा लागेल. अशा प्रकारे आपला नंबर रजिस्टर होऊन आपले प्रोफाईल ओपन झालेले दिसेल.
महत्वाच्या बातम्या :