Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP Majha
मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर, दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलंय.. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या, एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या... या आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावलीय..
एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजुनही फरार आहे. आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी कालच ताब्यात घेतलंय. तसंच हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलंय.
हे सगळं एकिकडे सुरु असताना संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून आज परभणीत मूकमोर्चा काढण्यात आला होता... या मोर्चात संतोष देशमुख कुटुंबियांसह, हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.. तसंच सर्वपक्षीय नेत्यांचीही लक्षणीय संख्या होती.. या मोर्चात बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांंनी, थेट मंत्री धनंजय मुंडेंवर तोफ डागली.. त्यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेत मुंडेंना इशारा दिला
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवरील हल्ले सुरुच ठेवले. आजच्या मूकमोर्चामध्ये भाषणादरम्यान आकाच्या आकाचा उल्लेख करताना धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही टोला लगावला...
परभणीच्या मोर्चामधून सर्वपक्षीय नेत्यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली... या मागचा खरा सूत्रधार हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.. तर बिहारलाही लाजवेल अशी परळीची अवस्था असल्याची टीका, शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधवांनी केली...
गेल्या दोन दिवसातील अटकसत्रावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
दरम्यान यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात... एक फरार आरोपी सोडला तर बाकी प्रमुख आरोपी पकडल्या गेले आहेत. मात्र विरोधकांच्या निशाण्यावर अजुनही धनंजय मुंडेंचं मंत्रीपद कायम आहे. अनेकांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असली तरी अजित पवार धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा आणि बीडच्या पालकमंत्रीपदाचा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे
परभणीवरुन पंकज क्षीरसागरसह गोविंद शेळके एबीपी माझा, बीड