एक्स्प्लोर

मुंबईच्या पीएफ कार्यालयातील धक्कादायक स्कॅम उघड; EPFO कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी हडपले

मुंबईच्या पीएफ कार्यालयातील धक्कादायक स्कॅम उघड झाला आहे. EPFO कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटींचा घोटाळा केला आहे.

मुंबई : कोविड साथीच्या  काळात लोकांना मदत व्हावी या हेतूनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO News) नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली. याचाच गैरफायदा घेत मुंबईतील कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं अंतर्गत लेखापरीक्षणात उघडकीस आलं आहे.

मुंबईतील कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं अंतर्गत इंटरनल ऑडिटमध्ये उघडकीस आलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे, मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान सगळ्या देशाचं लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होतं, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील 37 वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा यानं ही अफरातफर केली.

आता ही घोटाळा कस करण्यात आला?

जुलै 2021 च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे ही फसवणूक उघडकीस आली.

817 स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा केला आणि एकूण 21.5 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवले. 

या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढून घेण्यात आली असल्याचं तपासात स्पष्ट झालं.

या घोटाळ्यात ज्या अधिकाऱ्याने स्कॅम केला त्याच्याबरोबर याच कार्यालयातील आणखी पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे.

त्यानंतर या घोटाळ्याचा सूत्रधार हा एका स्थानिक रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर बेपत्ता झाला.

फसवणुकीने काढलेले पैसे ईपीएफओच्या एक निधीतील होते.

ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नोंदणीकृत संस्थांनी ठेवलेल्या ठेवीचे पैसे जमा केले जातात. 

हा पैसा मुख्यतः सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो.

या कामात त्याला त्याचा सहाय्यकाने सहकार्य केलं. गरजू आणि मुख्यतः बेरोजगार स्थलांतरित कामगारांकडून 5 हजार रुपये देऊन बँक खाती आणि आधार तपशील मिळवून त्यांनी हा गैरव्यवहार केला.

10-15 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मुंबईस्थित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ खाती उघडण्यात आली.

2014 पूर्वी उघडलेल्या पीएफ खात्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) काढण्याची तरतूद होती आणि पैसे काढताना तो नंबर तयार करणे अनिवार्य असे, नंतर ही सुविधा नव्हती. याचा फायदा घेण्यात आला.

2006 मध्ये बंद झालेल्या बी. विजय कुमार ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, लँडमार्क ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड, न्यू निर्मल इंडस्ट्रीज, साथी वेअर कॉर्पोरेशन आणि नॅशनल वायर या कंपन्यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

लॉकडाउनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड या अधिकाऱ्याला दिले आणि नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. तसंच सिस्टीममधील काही त्रुटींचा त्यानं उपयोग केला. पीएफमधून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दुसऱ्या पडताळणीनंतरच त्याला मंजुरी दिली जाते. पण एक ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी अशी तरतूद नाही. लेखा परीक्षणातील तरतुदीं बाबतही माहिती होती.

दरम्यान, ईपीएफओने अंतर्गत लेखापरीक्षणाची व्याप्ती वाढवली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बँकांना ही 817 बँक खाती गोठवण्यासाठी (Freeze) पत्र लिहिले आहे. तसंच आतापर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मागोवा घेऊन ती वसूल करण्यात आली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Embed widget