मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. लष्कारचं वाहन दरीत कोसळलं आहे. यामध्ये 4 जवान शहीद झाले आहेत.
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. लष्कारचं वाहन दरीत कोसळलं आहे. यामध्ये 4 जवान शहीद झाले आहेत. तर 2 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या जवानांना तात्काळ रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एसके पायीन भागात हा अपघात झाला. ट्रक घसरून दरीत कोसळला आहे. त्यामुळे हा भीषण आपघात झाला आहे. दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. यामध्ये स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान सहभागी आहेत.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत 9 जवानांचा अपघाती अंत झाला आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: 2 soldiers died, 3 injured after an Army vehicle veered off the road and plunged into a deep gorge near the Wular Viewpoint in the Bandipora district pic.twitter.com/lQ8MAoY9ca
— ANI (@ANI) January 4, 2025
24 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले होते
दरम्यान, याआधीही 24 डिसेंबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले होते. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात 5 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज पुन्हा वाहन दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत.
31 डिसेंबरलाही झाला होता अपघात
बरोबर चार दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला होता. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता झाला होता. जेव्हा अनेक जवानांना घेऊन लष्कराचे वाहन ऑपरेशनल ड्युटीवर जात होते, यावेळी वाटेत हा अपघात झाला होता. लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले होते. या अपघातातही 5 जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: