एक्स्प्लोर

Personal Loan Tips : वैयक्तिक कर्ज घेताय? मग 'या' 10 चुका टाळा, नाहीतर आर्थिक जाळ्यात अडकता

भारतात वैयक्तिक कर्जाची मागणी झपाट्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 2024 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात वैयक्तिक कर्ज क्षेत्रात 24% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

भारतात वैयक्तिक कर्जाची मागणी झपाट्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 2024 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात वैयक्तिक कर्ज क्षेत्रात 24% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, घराचं नूतनीकरण, लग्न किंवा जुनं कर्ज एकत्र करणे. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकजण या सहज उपलब्ध होणाऱ्या कर्जाकडे वळत आहेत. मात्र, या सोयीच्या नावाखाली अनेक वेळा काही चुका घडतात ज्या नंतर मोठ्या आर्थिक अडचणींचं कारण ठरतात. त्यामुळे अशा 10 चुका दिल्या आहेत आणि त्या टाळण्यासाठी काय करायला हवं, हेही सांगितलं आहे...

1. फक्त झटपट मंजुरीच्या मागे लागणे आणि पर्यायांची तुलना न करणे

आजच्या डिजिटल युगात वैयक्तिक कर्ज काही मिनिटांत मंजूर होऊ शकते. पण या घाईत अनेक जण विविध कर्जदात्यांची तुलना करत नाहीत. झटपट मंजुरीचे आमिष दाखवून काहीजण लपवलेले शुल्क, जास्त व्याजदर लावतात. त्यामुळे किमान 3-4 कर्जदात्यांची व्याजदर, प्रक्रिया शुल्क, प्रीपेमेंट अटी आणि लवचिकता यांवर तुलना करा.

2. फक्त व्याजदर पाहणे, एकूण खर्चाकडे दुर्लक्ष करणे

"कमी व्याजदर" पाहून खुश होणं सोपं असतं, पण त्या पाठीमागे अनेकदा प्रक्रिया शुल्क, विमा आणि इतर खर्च लपलेले असतात. त्यामुळे एकूण परतफेड वाढते. फक्त दर न पाहता ‘कर्ज घेण्याचा एकूण खर्च’ समजून घ्या.

3. क्रेडिट स्कोअरकडे दुर्लक्ष करणे

आजचे कर्जदाता तुमच्या क्रेडिट स्कोअरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. CIBIL च्या 2024 च्या माहितीनुसार, 750 पेक्षा जास्त स्कोअर असलेल्या ग्राहकांना तुलनेने 2-3% कमी व्याजदर मिळतो. स्कोअर न पाहता अर्ज केल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा जास्त व्याज लावले जाऊ शकते. आधी स्कोअर तपासा आणि गरज असल्यास तो सुधारावा.

4. गरजेपेक्षा जास्त रक्कम घेणे

वैयक्तिक कर्ज सहज मिळते, त्यामुळे अनेक वेळा लोक गरजेपेक्षा जास्त रक्कम घेतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक जादा रुपयावर व्याज लागू होते. गरज असलेली रक्कमच घ्या, नाहीतर नको असलेली कर्जाची ओझी वाढतात.

5. चुकीचा कार्यकाल निवडणे

लहान कार्यकाल म्हणजे जास्त EMI, जे तुमचं मासिक बजेट बिघडवू शकतं. मोठा कार्यकाल म्हणजे एकूण जास्त व्याजाचा बोजा. योग्य तो समतोल साधा, EMI तुमच्या मासिक उत्पन्नात सहज बसणारी असावी आणि एकूण व्याजही मर्यादेत असावं. 

6. कर्ज अटी नीट न वाचणे

प्रीपेमेंट शुल्क, दंड, फोरक्लोजर अटी हे सर्व बारीक अक्षरात दिलं जातं आणि बरेचजण ते वाचत नाहीत. कर्जाचा करार नीट वाचा, आणि कुठलंही शंका असल्यास स्पष्टीकरण बोला.

7. जोखमीच्या गुंतवणुकीसाठी कर्ज घेणे

काही लोक स्टॉक्स, क्रिप्टो किंवा शंका उत्पन्न करणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज घेतात. गुंतवणुकीत परतावा हमीचा नसतो, पण कर्ज परतफेड मात्र हमखास करावी लागते. त्यामुळे असे धोके टाळा.

8. बनावट किंवा अधिकृत नसलेल्या कर्जदात्यांच्या जाळ्यात अडकणे

RBI आणि सायबर युनिटने अशा अनेक 'इंस्टंट लोन अ‍ॅप्स'ना निषिद्ध घोषित केलं आहे. या अ‍ॅप्सकडून फसवणूक, धमक्या आणि डेटा चोरीचे प्रकार घडतात. नेहमी RBI-नोंदणीकृत आणि अधिकृत कर्जदात्यांकडूनच कर्ज घ्या.

9. परतफेडचं योग्य नियोजन न करणे

"नंतर पाहू" असा विचार केल्याने अनेकदा EMI चुकतात. त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो आणि दंडही लागतो. EMI वेळेवर भरायला ऑटो-डेबिट सेट करा आणि बजेट आधीच तयार ठेवा.

10. प्रीपेमेंटचा विचार न करणे

बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळालं तर त्यातून कर्जाचं काही प्रमाण प्रीपे करण्याचा विचार करा. यामुळे एकूण व्याजात मोठी बचत होऊ शकते. प्रीपेमेंटच्या अटी सहज आणि स्वस्त असलेल्या कर्जदात्यांना प्राधान्य द्या.

वैयक्तिक कर्ज गरजेच्या वेळी मोठा आधार ठरू शकतं, पण ते आपल्या डोक्यावर ओझं होणार की हातातली ताकद, हे पूर्णपणे तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे. या चुका टाळून तुम्ही आत्मविश्वासाने कर्ज घेऊ शकता आणि आर्थिक स्थैर्य राखू शकता.

वाचकांसाठी छोटा सल्ला :

जसं एखादं महागडं प्रॉडक्ट विकत घेताना तुम्ही वेळ घेता, किंमत पाहता, तुलना करता, तसंच कर्ज घेतानाही करा. थोडा अभ्यास आज केलात, तर उद्याचं टेन्शन निश्चितच टाळता येईल.

(चिंतन पंचमत्या, संस्थापक, स्विच माय लोन)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Embed widget