DOMS Industries IPO: पहिल्यांच दिवशी बंपर कमाई; 77 टक्के प्रीमियमवर लिस्टिंग, 1400 पार पोहोचला शेअर
Doms Industries IPO: डीओएमएस इंडस्ट्रीजचा आयपीओ (DOMS Industries IPO) बुधवारी 77 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला. त्याच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी 1,400 रुपयांचा टप्पा ओलांडला, तर इश्यूची किंमत 790 रुपये होती.
Doms Industries IPO Listing: डोम्स इंडस्ट्रीजचा आयपीओ (DOMS Industries IPO) आल्यानंतर शेअर्स आज, म्हणजेच बुधवारी (20 डिसेंबर, 2023) रोजी NSE आणि BSE वर लिस्ट झाले आहेत. DOMS इंडस्ट्रीजचा IPO 77.22 टक्क्यांच्या प्रीमियमसह 1,400 रुपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला, तर त्याची इश्यू किंमत 790 रुपये प्रति शेअर होती. कंपनीचं मार्केट कॅप 8,496.21 कोटी रुपये होतं. दरम्यान, DOMS Industries IPO 13 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 15 डिसेंबर रोजी बंद झाला.
BSE वर 36,052 शेअर्सच्या विक्री ऑर्डरच्या तुलनेत, DOMS इंडस्ट्रीजनं सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी 2,91,098 शेअर्सच्या खरेदी ऑर्डर होत्या. ब्रँडेड रायटिंग प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीला गुंतवणूकदारांच्या वतीनं जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. हा एकूण 99.34 वेळा सब्सक्राइब करण्यात आला होता. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी 73.38 पट सब्सक्राइब केलं होतं. तर, QIB नं 122.16 पट आणि NII नं 70.06 पट सदस्यत्व घेतलं होतं.
डोम्स आयपीओचे डिटेल्स
DOMS इंडस्ट्रीजची योजना आयपीओमार्फत 1,200.00 कोटी रुपये जमवण्याची होती. यामध्ये 350 कोटी रुपयांचे 0.44 कोटी शेअर फ्रेश इश्यूचे होते, तर 850 कोटी रुपयांचे 1.08 कोटी शेअर ओएफएसच्या मार्फत विक्रीसाठी उपलब्ध होते. DOMS IPO चा प्राईज बँड 750 पासून 790 रुपयांपर्यंत प्रति शेअर ठरवण्यात आला होता. या IPO चा एक लॉट 18 शेअर्सचा होता, ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,220 कोटी रुपये गुंतवावे लागले होते.
ग्रे मार्केटपेक्षा जास्त मिळाला प्रीमियम
DOMS Industries चे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्येही तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. DOMS Industries चे शेअर्स 64.56 टक्क्यांसह तेजीत होते. परंतु, शेअर बाजारात लिस्टिंगच्या वेळी ते 77 टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्टि झाले होते. डोम्स आयपीओचा GMP 510 रुपये होता.
डोम्स इंडस्ट्रीजचं मोठं नेटवर्क
डोम्स कंपनीकडे उमरगाव, गुजरात आणि बारी ब्रह्मा, जम्मू आणि काश्मीर येथे 11 उत्पादन सुविधा आहेत. कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर मल्टी-चॅनेल वितरण नेटवर्क आहे, ज्याची संपूर्ण भारतामध्ये मजबूत उपस्थिती आहे. सामान्य व्यापारासाठी देशांतर्गत वितरण नेटवर्कमध्ये 100 सुपर-स्टॉकिस्ट आणि 3,750 वितरकांचा समावेश आहे जे 3,500 शहरं आणि शहरांमध्ये 115,000 रिटेल टच पॉइंट्स कव्हर करतात.
T+3 सिस्टमद्वारे लिस्टिंग
Doms IPO च्या वाटपाची तारीख 18 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली होती, तर शेअर्स 19 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा करण्यात आले. यासोबतच, कंपनीनं आपल्या लिस्टिंगसाठी 20 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार, आज लिस्टिंग झालं आहे. विशेष बाब म्हणजे, 1 डिसेंबरपासून शेअर बाजारात T+3 टाईमलाईन अनिवार्य करण्यात आली आहे आणि या सिस्टमद्वारे बाजारात पदार्पण करणारी ही पहिली कंपनी ठरणार आहे.
T+3 सिस्टम म्हणजे काय?
मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ने Initial Public Offering म्हणजेच, आयपीओ (IPO) बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे. यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती. लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे. SEBI ने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे.
(टिप : वरील तपशील केवळ माहितीसाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आयपीओ मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शेअर मार्केट संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :