Pepsico Partner Varun Beverages Shares: Pepsi ची पार्टनर असलेली भारतीय कंपनी जोमात, एका डीलमुळे शेअर्स सुसाट, 18 टक्क्यांची तुफानी वाढ
Varun Beverages चे शेअर्स सध्या मार्केटमध्ये जोमात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी कारण ठरतेय कंपनीची नवी डिल, काय आहे जाणून घ्या सविस्तर...
![Pepsico Partner Varun Beverages Shares: Pepsi ची पार्टनर असलेली भारतीय कंपनी जोमात, एका डीलमुळे शेअर्स सुसाट, 18 टक्क्यांची तुफानी वाढ Pepsico Partner Varun Beverages Shares Price Hike by 18 percent to record after south africa bevco buyout stock gives multibagger return to investors Pepsico Partner Varun Beverages Shares: Pepsi ची पार्टनर असलेली भारतीय कंपनी जोमात, एका डीलमुळे शेअर्स सुसाट, 18 टक्क्यांची तुफानी वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/06/2fa6df8049fd5d4e29418b3b328c8e151670308000548314_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pepsico Partner Varun Beverages Shares: थोरामोठ्यांची आवडती पेप्सी बनवणाऱ्या पेप्सिको (PepsiCo) कंपनीचा अमेरिकेबाहेरचा दुसरा सर्वात मोठा बोटलिंग पार्टनर वरुण बेव्हरेजेस (Varun Beverages Share Price) चे शेअर्स तेजीत आहेत. बुधवारी बाजार उघडताच शेअर्सनी (Share Market) 18 टक्क्यांनी उसळी घेतली. कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी मोठी उसळी का झालीय? तर यासाठी एक वृत्त कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. वरुण बेव्हरेजेसनं दक्षिण आफ्रिकन कंपनी बेव्हकोसोबत (Bevco) मोठा करार केला असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे.
शेअर्समध्ये प्रचंड उसळी
वरुण बेव्हरेजेसच्या (Varun Beverages) शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर शेअर मार्केटची आज सुरुवात जोरदार झाली. या कंपनीचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे धावताना दिसले. रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी शेअर 1345 रुपयांवर उघडल्यानंतर काही मिनिटांतच 1380 रुपयांची पातळी गाठली. महत्त्वाची बाब म्हणजे, वरुण बेव्हरेजेसच्या शेअर्सची ही 52 आठवड्यांची उच्च पातळी आहे. कंपनीचं बाजार भांडवल 1.68 लाख कोटी रुपये आहे.
1320 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा परिणाम
वरुण बेव्हरेजेस लिमिटेड (VBL) च्या शेअर्सच्या वाढीमागे कंपनीनं केलेली मोठी डील असल्याचं बोललं जात आहे. वरुण बेव्हरेजेसनं दक्षिण आफ्रिकन पेय कंपनी बेव्हको आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या सब्सिडियरी कंपन्यांचं अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. PepsiCo च्या सर्वात मोठ्या फ्रँचायझी बॉटलर VBL नं मंगळवारी त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये या डीलबद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा करार 1,320 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर केला गेला आहे आणि वरुण बेव्हरेजेसला आफ्रिकन बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्यास मदत करेल.
एकीकडे वरुण बेव्हरेजेस भारतातील पेप्सिकोचे बॉटलिंग पार्टनर आहेत, तर दुसरीकडे बेव्हकोकडे दक्षिण आफ्रिका, लेसोथो आणि इस्वातिनीमधील पेप्सिकोचे फ्रँचायझी अधिकार आहेत. या कंपनीकडे नामिबिया आणि बोत्सवानाचे वितरण अधिकारही आहेत. हा करार 31 जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
5 वर्षांत मिळालेत Multibagger रिटर्न
Varun Beverages Share हा त्याच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. कंपनीची कामगिरी आणि वाढ पाहिल्यास, गेल्या पाच वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना 1087 टक्के मजबूत परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरची किंमत 86.37 टक्क्यांनी वाढली आहे.
सहा महिन्यांत वरुण बेव्हरेजेसनं गुंतवणूकदारांना सुमारे 60 टक्के रिटर्न दिला आहे, तर गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरनं 24 टक्के परतावा दिला आहे. आता जर आपण अलीकडच्या परिस्थितीबद्दल बोललो तर, गेल्या पाच दिवसांपासून या शेअर्समधील वाढीचं सत्र सतत सुरू आहे. या 5 दिवसांत शेअरच्या किमतींत 18 टक्के किंवा 197 रुपयांनी वाढ झाली आहे.
(महत्त्वाची टिप : शेअर बाजारातील कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. ABP Majha यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)