एक्स्प्लोर
Advertisement
नवउद्योजकांसाठी 'विको'चे संजीव पेंढारकरांचा उपक्रम, ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन
लॉकडाऊनमुळं सध्या अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेले आहेत. या काळात नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी 'विको'चे संजीव पेंढारकर यांनी एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
मुंबई : कोरोनामुळं सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळं सध्या अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेले आहेत. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेक युवकांवर कोसळली आहे. यादरम्यान अनेक उद्योजकांनी मदतीचा हात दिला आहे. याच साखळीत आता 'विको'चे संजीव पेंढारकर यांनी देखील एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
नवउद्योजक व ज्यांना नवीन व्यवसाय करायची स्वप्न आहेत अशा लोकांना पेंढारकर ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत संजीव पेंढारकर यांनी सांगितलं की, माझ्या 45 वर्षांच्या व्यावयायिक कारकिर्दीचा अनुभव ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून समजवणार आहे. नवउद्योजक व ज्यांना नवीन व्यवसाय करायची स्वप्न आहेत त्यांनी या ऑनलाईन कोर्ससाठी वेबसाईटवर नावनोंदणी करावी.
या कोर्समध्ये काय शिकाल ?
1. सेल्स व मार्केटिंग प्रभावीपणे करण्याच्या पध्दती
2. नवीन प्रोडक्ट्स प्रोजेक्टचे रिसर्च कसे करावे
3. फायनान्स व अकाउंटिंगचे महत्व
4. मनुष्यबळ विकास व त्याचे नियोजन
5. नवीन व्यापार संधी कशा ओळखाव्या
6. कंपनीचे आर्थिक ताळेबंद कसे मजबूत करावे
7. आपल्या ग्राहकाच्या गरजा व त्याची काळजी कशी घ्यावी
8. जाहिरात व पब्लिक रिलेशन कसे वाढवावे.
9. प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करताना वापरायच्या स्ट्रॅटेजी.
10. विको व्यवसाय उभारताना आलेले अनुभव.
11. कच्चा माल व तयार प्रोडक्ट्स हॅण्डल करायची पध्धत.
12 . निर्यात करण्याचे फायदे व पद्धती.
हा ऑनलाईन कोर्स मराठी व इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. कोर्सची फी फक्त 1200 रुपये आहे. त्यासोबत आमच्या मार्गदर्शकांच्या प्रायव्हेट ग्रुपची सदस्यता मोफत मिळेल, असं देखील संजीव पेंढारकर यांनी सांगितलं आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी https://www.sanjeevpendharkar.com या वेबसाईटवर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
संजीव पेंढारकर हे आपल्या वेबसाईटवरुन वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत असतात. लॉकडाऊन संपल्यावर कंपनी सुरळीतपणे कशी सुरु करायची? व्यवसाय करायचा विचार करत असाल तर, तेव्हा आत्मनिर्भर कसे व्हावे याबद्दल संजीव पेंढारकर यांचे अनेक मार्गदर्शनाचे व्हिडीओ त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
VIDEO : एंजल इन्वेस्टर्सचा पर्याय या काळासाठी योग्य | 'विको लॅबोरेटरीज'चे संचालक संजीव पेंढारकर | माझा गेस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement