परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1... फडणवीसांनी थेट आकडे दाखवले; म्हणाले कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते!
थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरलं जातं. राज्यातील परकीय गुंतवणूक घटली आहे. परदेशातील उद्योग अन्य राज्यांत जात आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जातो. तर राज्यातील परकीय गुंतवणूक (Foreign Investment) वाढली आहे. आगामी काळातही अनेक उद्योग राज्यात येतील, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असं समाजमाध्यमावरून सांगितलं आहे. तशी आकडेवरीच फडणवीसांनी प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे- फडणवीस
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर राहिला आहे. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांतसुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे, असे फडणवीस आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
फडणवीसांनी मांडली आकडेवारी
तसेच 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी तर 2023-24 या आर्थिक वर्षांत 1,25,101 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या दोन्ही आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे गणित फडणवीस यांनी मांडले आहे.
बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते...
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2024
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर !
एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केंद्र सरकारच्या… pic.twitter.com/2js1CYr59s
फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका
विशेष म्हणजे पुन्हे त्यांनी कधीकाळी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला डिवचलंय. बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असं फडणवीसांनी म्हटलंय.
विरोधक काय उत्तर देणार?
दरम्यान, फडणवीसांच्या या ट्वीटनंतर आता विरोधक काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
'हे' महत्त्वाचे काम करण्याची शेवटची संधी; नाहीतर कापला जाणार अतिरिक्त टीडीएस!
मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?
जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
