(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'हे' महत्त्वाचे काम करण्याची शेवटची संधी; नाहीतर कापला जाणार अतिरिक्त टीडीएस!
प्राप्तिकर विभागाने दोन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यामुळे करदात्यांसाठी आजच्या दिवसाची ही शेवटची संधी असणार आहे.
मुंबई : देशातील सर्व करदात्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आमचा टीडीएस जास्त कापला जातोय, अशी खंत अनेकजण व्यक्त करतात. हाच अतिरिक्त टीडीएस कापला जाऊ नये म्हणून करदात्यांसाठी आजच्या दिवशाची ही शेवटची संधी असेल. या संधीचा लाभ न घेतल्यास भविष्यात त्यांना कररुपात अतिरिक्त पैसे भरावे लागू शकतात.
ही शेवटची संधी
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक न केल्यामुळे भविष्यात अतिरिक्त कर कापला जाऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही कागदपत्रं एकमेकांशी लिंक करून घ्या, असे आवाहन काही दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विभागाने केले होते. नियमानुसार आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणे हे बंधनकारक आहे. 31 मे रोजी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे प्राप्तिकर विभागाने सांगितले होते. तसे न केल्यास करदात्यांना अतिरिक्त टीडीएसचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच आजचा दिवस करदात्यांसाठी महत्त्वाचा आहे.
...तर होणार 'हा' फायदा
प्राप्तिकर विभागाने दोन दिवासांआधीच याबाबत समाजमाध्यमाच्या रुपात करदात्यांना याबाबत माहिती दिली होती. तुमचा आधार नंबर पॅन नंबरशी जोडलेला असेल तर प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 206 एए आणि 206 सीसी अंतर्गत टीडीएसच्या रुपात अतिरिक्त कर कापला जाणार नाही.
आधार-पॅन एकमेकांना लिंक नसल्यास 'हा' तोटा होणार
31 मे 2024 पर्यंत आधार आणि पॅन एकमेकांशी लिंक न केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. यातील सर्वांत मोठं नुकसान म्हणजे तुमचा अतिरिक्त टीडीएस कापला जाऊ शकतो. टीडीएस यासह अतिरिक्त टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अॅट सोअर्स) भरावा लागू शकतो.
आधार पॅनशी कसे लिंक करावे?
>>> आधार पॅनशी लिंक करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
>>> सर्वांत अगोदर प्राप्तिकर विभागाच्या https://incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
>>> त्यानंतर सर्व्हिसेस मेन्यावर जाऊन लिंक पॅन-आधार ऑप्शनवर क्लीक करावे.
>>> त्यानंतर पॅन आणि आधारची माहिती टाकावी
>>> कॅप्चा टाकून ओटीपी व्हेरिफाय करावा.
>>> व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार आणि पॅन एकमेकांशी लिंक होईल.
हेही वाचा :
मॉडलिंग, अभिनय ते 'डीजे वाले बाबू'ची हिरोईन; हार्दिक पांड्याची पत्नी नताशा किती कोटींची मालकीण?
घटस्फोटानंतर मिळालेल्या पोटगीवर कर लागतो का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या...
जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?