एक्स्प्लोर

जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?

शेअर बाजारात सध्या चढ-उतार पाहायला मिळतोय. आगामी जून महिन्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद असणार आहे. या तिन्ही दिवशी गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येणार नाहीत.

मुंबई : अनेकजण शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवणून भरपूर पैसे कमवातात. आठवड्यात एकूण पाच दिवस शेअर दिवस चालू असतो. या पाच दिवसांत कशा प्रकारे पैसे गुंतवले पाहिजेत, त्यासाठी कोणते नियोजन आखले पाहिजे, याचा विचार गुंतवणूकदार आधीपासूनच करत असतात. उद्यापासून (1 जून) जून महिना चालू होत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी नव्या महिन्यासाठी आपली स्ट्रॅटेजी आखली असेल. दरम्यान, याच जून महिन्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद असणार आहे. या तिन्ही दिवसांत गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येणार नाहीत. 

सलग तीन दिवस शेअर बाजार बंद

मुंबई शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर शेअर बाजाराला किती दिवस सुट्ट्या असतील, याची माहिती दिलेली आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे 1 आणि 2 जून रोजी शेअर बाजार बंद असणार आहे. यासह आगामी 15, 16, 17 जून रोजीदेखील शेअर बाजार बंद असणार आहे. त्यामुळे या सुट्ट्या चालू होण्याआधीच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करून ठेवावे लागणार आहेत. 17 जूनपासून चालू होणाऱ्या भांवडवली बाजारात पाच ऐवजी फक्त चार दिवसच शेअर बाजार चालू असणार आहे. 

आगामी महिन्यांत शेअर बाजार किती दिवस बंद असणार?

जून महिन्यानंतर 2024 साली जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर 1-1 दिवस शेअर बाजार बंद असेल. नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसांसाठी शेअर बाजार बंद असेल. डिसेंबर महिन्यातही आठवडी सुट्ट्यांव्यतिरिक्त एक दिवस शेअर बाजार बंद असेल. 

चार जून रोजी निकाल, शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचे एक्झिट पोल येत्या 1 जून रोजी येतील. एक्झिट पोल येताच देशात कोणाचे सरकार येणार, या बाबाबत अनेक अंदाज बांधले जातील. त्याचाच थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा आल्यास काय होणार? यावेळी विरोधकांनी बाजी मारल्यावर शेअर बाजार पडणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच कारणामुळे सध्या गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत. 

सध्या शेअर बाजारात अस्थिरता

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता जाणवत आहेत. कधी एखादा शेअर चांलगी मुसंडी मारताना दिसतोय. तर एखादा शेअर कोसळताना दिसतोय. केंद्रात येणाऱ्या सरकारबाबतही अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार हात राखूनच पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे आता येत्या चार जून रोजीच्या निकालावरच शेअर बाजाराची स्थिती ठरणार आहे. 

सेन्सेक्स, निफ्टीची स्थिती काय?

दरम्यान, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशाक सकारात्मक स्थितीत दिसले. सध्या निफ्टी निर्देशांक 22522 अंकांवर आहे. तर मुंबई शेअर बाजार 74029.02 अंकांवर आहे. आज दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पंचाहत्तर हजारांच्या पुढे जाणार का? तसेच राष्ट्रीय शेअर बाजारही 23 हजारांचा आकडा गाठणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget