(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात तेजी कायम, Nifty Bank मध्ये 684 अंकांची उसळण
Stock Market Updates : बँक इंडेक्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे तर कॅपिटल गुड्स, फार्मा, उर्जा, मेटल इंडेंक्समध्ये एका टक्क्यापर्यंत घसरण झाली.
मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात (Stock Market Updates) काहीशी तेजी सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभरात बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली असली तरी बाजार बंद होताना मात्र तो वधारला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 104 अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये (Nifty) 12 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.18 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,307 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,576 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मात्र 684 अंकांची वाढ झाली असून तो 40,784 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बजार बंद होताना एकूण 1404 कंपन्यांच्या शेअर्सध्ये वाढ झाली तर 1920 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 136 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बँक इंडेक्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. तर कॅपिटल गुड्स, फार्मा, उर्जा, मेटल इंडेंक्समध्ये एका टक्क्यापर्यंत घसरण झाली.
शेअर बाजार बंद होताना Axis Bank, Kotak Mahindra Bank, ICICI Bank, HUL आणि SBI Life Insurance यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Bajaj Finance, Bajaj Finserv, Divis Labs, Adani Ports आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये प्रत्येकी 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात तेजीने
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 178.46 अंकांनी वधारत 59,381.36 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58.902 अंकांच्या तेजीसह 17,622 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 275 अंकांच्या तेजीसह 59,477.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, 75.55 अंकांच्या तेजीसह 17,639.50 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
Axis Bank- 9.03 टक्के
Kotak Mahindra- 2.10 टक्के
ICICI Bank- 2.08 टक्के
HUL- 2.04 टक्के
SBI Life Insura- 1.91 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
Bajaj Finance- 3.22 टक्के
Bajaj Finserv- 2.39 टक्के
Adani Ports- 2.24 टक्के
Divis Labs - 2.20 टक्के
UPL- 1.86 टक्के