एक्स्प्लोर

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी अस्थिरता, Sensex 200 अंकांनी घसरला

Stock Market Updates : आयटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.  

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. शेअर बाजारातील आजचा दिवस चांगलाच अस्थिर असल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 200 अंकांची घसरण झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 73 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची घसरण झाली असून तो 57,991.11 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.43 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,241 अंकावर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 84 अंकांची घसरण होऊन तो 39,093 अंकावर पोहोचला. 

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. बाजार खुला होताच सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला. पण बाजार बंद होताना तो काहीसा सावरून घसरण 200 अंकांपर्यंत खाली आली. आज शेअर बाजार बंद होताना 1406 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2056 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 161 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

शेअर बाजार बंद होताना आज Tata Motors, Tata Consumer Products, Hero MotoCorp, Asian Paints आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी घसरण झाली. तर Axis Bank, TCS, HDFC Life, Eicher Motors आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली. 

आज आयटी क्षेत्र सोडलं तर इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाली आहे. सार्वजनिक बँका, रिअॅलिटी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली आहे. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स  767.22 अंकांच्या घसरणीसह 57,424.07  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 220.30 अंकांच्या घसरणीसह 17,094.35 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 234  अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Axis Bank- 2.80 टक्के
  • TCS- 1.75 टक्के
  • HDFC Life- 1.21 टक्के
  • Maruti Suzuki- 0.95 टक्के
  • Eicher Motors- 0.94 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली 

  • Tata Motors- 3.93 टक्के
  • TATA Cons. Prod- 3.04 टक्के
  • Hero Motocorp- 2.07 टक्के
  • Asian Paints- 1.97 टक्के
  • ITC- 1.87 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget