Share Market : आजही Sensex 634 अंकानी घसरला, तीन दिवसांत 2000 अंकाहून अधिक घसरण; IT, फार्मा आणि FMCG कंपन्यांना मोठा फटका
Share Market : गेल्या तीन दिवसात Sensex 2000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. Nifty मध्ये आजही घसरण झाली असून तो 17,800 वर पोहोचला आहे.
मुंबई : शेअर बाजारातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही सुरुच असून आजही सेन्सेक्समध्ये 634 अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीही 181 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.06 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,464.62 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 181.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,757 वर पोहोचला आहे. या तीन दिवसांमध्ये सेन्सेक्स एकूण 2000 हून अधिक अंकांनी घसरल्याने गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येतंय.
आज 1593 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1606 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 64 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल, उर्जा, रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँक ऑटो, आयटी, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्समध्ये 0.8 ते 1.7 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Bajaj Finserv, Infosys, TCS, Divis Lab आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Power Grid Corporation, Bharti Airtel, Grasim Industries, JSW Steel आणि Britannia Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Power Grid Corp- 4.89 टक्के
- Bharti Airtel- 1.66 टक्के
- Grasim- 1.36 टक्के
- JSW Steel- 1.16 टक्के
- Britannia- 0.83 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Bajaj Finserv- 4.53 टक्के
- Bajaj Auto- 3.73 टक्के
- Divis Labs- 3.39 टक्के
- Infosys- 2.32 टक्के
- TCS- 2.25 टक्के
आज सकाळी शेअर बाजार उघडताच सुरुवातीलाच सेन्सेक्स 300 अंकांनी 0.50 टक्के घसरला होता. निफ्टी 70 अंकांनी 0.4 टक्क्यांनी घसरून 17,870 वर पोहोचला होता. आयटी आणि बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली होती. त्यानंतरही ही पडझड कायम राहिली.
महत्त्वाच्या बातम्या :