एक्स्प्लोर

Share Market: शेअर बाजारात उसळण, Nifty 17,600 वर तर Sensex 551 अंकांनी वधारला

Stock Market Update : एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. बँक, कॅपिटल गुड्स, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे.

मुंबई : शेअर बाजारासाठी (Stock Market Update) आजचा दिवस सकारात्मक राहिला असून गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा झाल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) असलेल्या सेन्सेक्समध्ये (Sensex) 551 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये (Nifty) 124 अंकांची वाढ झालेली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.88 टक्क्क्यांची वाढ होऊन तो 59,332 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.71 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,659 वर पोहोचला. जागतिक स्तरावर काही सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांचा खरेदीकडे असलेल्या ओढ्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. 

आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1772 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1530 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 138 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Axis Bank, Bajaj Finance, HDFC, Tech Mahindra आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये आज वाढ झाली. तर Tata Consumer Products, Apollo Hospitals, ITC, Hindalco Industries आणि NTPC या कंपनीच्या निफ्टीमध्ये घट झाली. 

आज एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. बँक, कॅपिटल गुड्स, आयटी, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची वाढ झालेली आहे. 

रुपया 12 पैशांनी घसरला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 12 पैशांनी घसरली असून आज रुपयाची किंमत ही 79.63 इतकी आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात
शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक झाली. BSE सेन्सेक्स 503.16 अंकांच्या म्हणजेच, 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 59,320.45 वर उघडला. याशिवाय, NSE च्या निफ्टीनं 176.90 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,711.65 वर व्यापार सुरू केला आहे. 

या कंपन्याचे शेअर्स वधारले

  • Axis Bank- 2.69 टक्के
  • Bajaj Finance- 2.37 टक्के
  • HDFC- 2.36 टक्के
  • Tech Mahindra- 2.09 टक्के
  • TCS- 2.03 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • TATA Cons. Prod- 2.16 टक्के
  • Apollo Hospital- 1.94 टक्के
  • ITC- 1.59 टक्के
  • Hindalco- 1.50 टक्के
  • NTPC- 1.35 टक्के

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
Share Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप
Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार
Share Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
तीन दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार कमबॅक,सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, चार प्रमुख कारणं जाणून घ्या
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?
Sai Sudharsan Debut : 'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार
लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांना स्वंयपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी 9 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?
Embed widget