Car Sales : 2024 मध्ये कार विक्रीचा नवा विक्रम, दर तासाला 50 लाखापेक्षा अधिक किंमतीच्या 6 कारची विक्री
2024 मध्ये देशात मोठ्या प्रमाणात कारची विक्री (Car Sales) झाली आहे. दर तासाला 50 लाखा रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सहाहून अधिक गाड्यांची विक्री झाल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.
Car Sales : 2024 मध्ये देशात मोठ्या प्रमाणात कारची विक्री (Car Sales) झाली आहे. दर तासाला 50 लाखा रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सहाहून अधिक गाड्यांची विक्री झाल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी प्रति तास विकल्या गेलेल्या दोन कारच्या तुलनेत आता झालेली वाढ मोठी आहे.
2025 मध्ये 24 हून अधिक नवीन मॉडेल्स बाजारात आले आहेत. त्यामुळं लक्झरी कार खरेदी करण्यात मोठी वाढ झाली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, विकास दर मंद असू शकतो, 2025 मध्ये कार विक्रीत 8 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटानंतर कारच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे.
मर्सिडीज बाजारात आली
अनुकूल व्यवसाय वातावरण, स्थिर कमाई आणि सकारात्मक ग्राहकांची भावना यामुळं कारच्या विक्री क्षेत्रात मोठी वाढ जाली आहे. Mercedes-Benz India ची या वर्षाच्या अखेरीस सुमारे 20,000 कारची विक्री झाली आहे. ही एक मजबूत विक्री आहे. या कारच्या विक्रीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात 14,379 युनिट्सची विक्री झाली आहे. अहवालात 2025 मध्ये नवीन उत्पादन लॉन्च आणि बाजार विस्तारासह गती कायम ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
2025 मध्येही कारच्या विक्रीत मोठी वाढ होणार
बीएमडब्ल्यू इंडियानेही विक्रमी कामगिरी केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान कार विक्रीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात 10556 वाहन विक्रीची वाढ झाली आहे. ऑडी इंडियाने पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे विक्रीत 16 टक्के घट झाली आहे. लक्झरी कारचा भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत फक्त 1 टक्के वाटा आहे, जो प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी आहे.