एक्स्प्लोर

शहरी बेरोजगारीला मोदी सरकार लावणार लगाम?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

Budget 2022 : शहरातील बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार आणणार योजना?; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणेची शक्यता

Budget 2022 : शहरातील बेरोजगारीची समस्या संपवण्यासाठी मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये  मनरेगा ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.  शहरी भागासाठी मनरेगासारखी योजना अर्थसंक्लपाच्या अधिवेशनात जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. कारण, ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करण्यात येत आहे. सरकार या डेटाच्या साह्याने शहरी भागात असंघटित क्षेत्रातील कामगारांना मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते.  

कोरोनामुळे ज्यांनी आपला रोजगार गमावलाय, त्यांना पुन्हा रोजगार मिळावा या हेतूने ही योजना येण्याची शक्यता आहे. Centre for Monitoring Indian Economy (CMIE) च्या आकडेवारीनुसार, शहरी भागाताली बेरोजगारीचा दर  8.21 टक्केंवर पोहचलाय.  शहरातील बेरोजगारीची समस्या आणि कोरोना काळात महामारीदरम्यान रोजगार गमावणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश असेल. त्यामुळेच मनरेगासारखी योजना सरकार घेऊन येऊ शकते.  बीएमएसने अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाआधी अर्थमंत्रालयाला शहरी भागात मनरेगासारखी योजना आणण्याची मागणी केली होती.  

एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनरेगा या योजनेची घोषणा होऊ शकते.  कारण कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. अनेकांना शहरातून स्थलांतरीत व्हावं लागलेय. त्यातच आता ओमायक्रॉनसारखा नवीन विषाणू आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. त्यामुळेच सरकार मनरेगासारखी योजना घेऊन येऊ शकते.  

याआधी कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीनेही ग्रामीण भागातील मनरेगासारखी योजना शहरी भागातही आणण्याची शिफारस केली होती. शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली होती, त्यांनाही दिलासा मिळेल. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला, बेरोजगारीची समस्या वाढली, कर्जबाजारी वाढले, भूखबळीही जास्त झाले, मजूर आणि त्यांचे घरच्यांवर मोठा प्रभाव पडला. शिक्षण आणि आरोग्याच्या समस्याही वाढल्या. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडेल, असेही समितीने सांगितले.  दरम्यान, यूपीए सरकारने 2008 मध्ये ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मनरेगा योजना आणली होती. यामध्ये शंभर दिवसांपर्यंत रोजगार मिळत होता. यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा झाला होता.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget